कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १,३७६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १,१४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकुण १४,५१० चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ४११, आजरा- ३७, भुदरगड- २४, चंदगड- २०, गडहिंग्लज- ३०, गगनबावडा- ४, हातकणंगले- १२६, कागल- ५८करवीर- ३०४, पन्हाळा- ७६, राधानगरी- ३४, शाहूवाडी- ४८, शिरोळ- ८०, नगरपरिषद क्षेत्र- १०५, इतर जिल्हा व राज्यातील- १९ अशा १,३७६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ५४, ३३२  

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ३७, ६७३  

मृतांची संख्या,६८३

उपचार सुरू असलेले रुग्ण११, ९७६