कोल्हापूर : येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आवारात गरुड मंडप परिसरात वसुबारसनिमित्त सवत्स गायीची विधिवत पूजा देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी गणेश नेर्लेकर-देसाई, देवस्थानचे पुजारी पंकज दादरणे, प्रमोद उपाध्ये आणि देवस्थान समितीचे कर्मचारी उपस्थित होते. वसुबारसनिमित्त अंबाबाई देवीची सवत्स गोद्वादशी पूजा बांधण्यात आली होती. शुक्रवार पेठेतील गो-पालक बाळू पवार यांची गाय पूजनासाठी आणली होती.