कपिलेश्वर (प्रतिनिधी) : राजू शेट्टी यांच्या ऊस आंदोलनाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. कपिलेश्वर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्यानी ऊस दर जाहीर करा, अन्यथा राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी केली आहे.


मागील वर्षाचे दुसरा हप्ता 400 रुपये व चालू हंगामातील तुटणाऱ्या ऊसाला 3,500 रुपये दर साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा. या राजू शेट्टी यांनी केलेल्या मागणीला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.


नुकताच बिद्री सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम लागला असून राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर येथील मोठ्या प्रमाणात सभासद संख्या असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांनी मागणी केल्यानुसार ऊस दर जाहीर करावा, अन्यथा सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदीचा डिजिटल फलक मुख्य मार्गावर लावला आहे.