पिलीभीत : लोकसभा निवडणुकीत पिलीभीत मतदारसंघातून वरूण गांधी यांना भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर वरुण गांधी आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील होतं. भाजपाने तिकीट नाकारल्याने काँग्रेसने त्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे वरुण गांधी काय निर्णय घेणार ? याची सर्वांना उत्सुकता होती.आता वरुण गांधी यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत मोठा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, वरूण गांधी यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांच्या आई मनेका गांधी यांना भाजपने सुल्तानपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे.आता वरुण गांधी आपली आई मनेका गांधी यांच्या प्रचारावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करणार आहेत.

भाजपकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर कॉंग्रेसकडून वरूण गांधी यांना ऑफर देण्यात आली होती. यावर बोलताना उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंग म्हणाले “वरुण गांधी भाजपाचे खरे शिपाई आहेत. ते भाजपातच राहतील याचा विश्वास आहे. ते गांधी कुटुंबातील असून, भाजपानेच तीन वेळा खासदार बनवलं आहे”. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी गांधी कुटुंबातील असल्याने भाजपाने त्यांना तिकीट दिलं नसल्याचा आरोप केला होता. आता मात्र वरूण गांधी यांच्या उमेदवारीवर पडदा पडला असून ते भाजपातच राहणार असल्याच स्पष्ट झालंय.