अलीगढ ( वृत्तसंस्था ) दहशतवादविरोधी पथकाला सोमवारी उत्तर प्रदेशात मोठे यश मिळाले. एटीएसच्या पथकाने अलिगढच्या वेगवेगळ्या भागातून आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन स्वयंभू दहशतवाद्यांना अटक केली आहे. अब्दुल्ला अर्सलान आणि माझ बिन तारिक अशी या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून ते अलीगढचे रहिवासी आहेत.

या दोघांकडून ही दहशतवाद्यांनी ISIS ची शपथ घेतली आहे. त्यांच्याकडून आयएसआयएसचे प्रतिबंधित साहित्य आणि पेन ड्राइव्ह सापडले आहे. त्यांच्या हँडलर्सच्या सूचनेनुसार ते देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये काही मोठी घटना घडवून आणण्याची योजना आखत होते. यूपी एटीएसला गेल्या अनेक दिवसांपासून अशी माहिती मिळाली होती की, ISIS च्या विचारसरणीने प्रेरित होऊन काही लोकांनी ISIS ची शपथ घेतली आहे आणि ते देशविरोधी कट रचत आहेत.


मिळालेल्या माहितीच्या आधारे, यूपी एटीएसच्या पथकाने 5 नोव्हेंबर रोजी अब्दुल्ला अर्सलान आणि माझ बिन तारिक यांना अलीगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून ISIS आणि Al Qaeda India Subcontinent (AQIs) शी संबंधित अनेक छापील साहित्य आणि ISIS प्रचाराने भरलेले पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले आहेत.

दोन्ही दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. जिथे त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे दहशतवाद्यांच्या रिमांडची विनंतीही केली आहे.