कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांनी 19 आणि 20 सप्टेंबर रोजी बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले. यामध्ये खालील विषयांचा समावेश होता. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे काम हे राज्याला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन ना. दादा भुसे यांनी केले.
समृद्ध शाळेमध्ये समाविष्ट असणाऱ्या सुविधा 5 वर्षाचा प्लॅन तसेच ग्रीन फिल्ड,शाळा रेटरोफिटींग,दुर्गम शाळा आणि अतितात्काळ दुरुस्ती यांचा समावेश होता. मिशन शाळा कवचमध्ये 100 टक्के शाळांमध्ये CCTV बसवण्यासाठी केलेले प्रयत् ,सर्व यंत्रणांचा सहभाग घेणे, आर्थिक बाबीवर केलेली मात, राज्यातील पहिला विद्या सुरक्षित जिल् , आणि मिशन सूर्यकीरणचे सुतोवाच होते.
मिशन अंकुरचा उद्देश, कार्यवाहीचे स्वरूप , शिक्षकांची श्रेणी ठरवणे आणि त्याचे गुणवत्ता वाढीसाठी योगदान तसेच मिशन उत्कर्षमध्ये पीजीआयमध्ये उत्कर्ष श्रेणी मिळवण्याचे ध्येय ठेवणे,ज्याज्या ठिकाणी गुण वाढवणे शक्य आहे त्यासाठी अॅक्शन प्लॅन करणे, त्याची अंमलबजावणी व प्रत्यक्ष यश PGI व परख मध्ये राज्यात मिळवलेले प्रथम स्थान असे होते.
यावेळी पुण्यातील बालेवाडी इथे झालेल्या सादरीकरणाला लोकांनी उत्साहाने आणि टाळयांच्या गजरात प्रतिसाद दिला. तसेच मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे हस्ते करण्यात आला. तसेच मीना शेडकर,शिक्षणाधिकारी (माध्य) सुवर्णा सावंत, डायटचे तत्कालीन प्राचार्य डॉ . राजेंद्र भोई यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी इचलकरंजी मनपाचे शिक्षणाधिकारी भिकाजी कासार आणि कोल्हापूर मनपाचे प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार उपस्थित होते. तसेच संपूर्ण शिक्षण परिषदेमध्ये कोल्हापूरमधील उपक्रम चर्चेत राहिले. ना. भुसे यांनी आपल्या भाषणामध्ये कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या कामाबद्दल कौतुक केले. विशेषतः PGI ,परख , आधार व्हलीडेशन ,अपार ID तयार करणे , CCTV , पायाभूत सोयीसुविधा, क्रीडासुविधा, पदोनती अशा सर्वच बाबीमध्ये कोल्हापूर आघाडीवर असल्याने ते राज्याला दिशादर्शक असे कोल्हापूरचे मॉडेल राज्यात सर्वत्र राबवण्याच्या सूचना दिल्या.