पुणे ( प्रतिनिधी ) साधेपणा आणि थेट संवादाने सुनेत्रा पवारांनी पिंजून काढला बारामती लोकसभा मतदारसंघ ! कुठलाही गाजावाजा नाही की कुठल्याही लवाजम्याची भपकेबाजी नाही. आपले पती अजित पवार यांनी आजवर केलेली कामे, ती कामे सुरु असताना ‘ लो प्रोफाइल ‘राहून आपल्या पतीच्या कार्याला पूरक ठरणारी विविध संस्थांच्या माध्यमातून पत्नी म्हणून केलेली कामे याची माहिती गावोगावी पायपीट करीत लोकांमध्ये मिसळून त्या सांगत राहिल्या.


गेल्या पंधरा दिवसांत पवार कुटुंबात वादग्रस्त वक्तव्याबद्दल माध्यमांमध्ये ताणतणावाचे चित्र महाराष्ट्रापुढे उभे राहिले. त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी लोकांशी थेट संवादावर भर दिला. त्याचाच म्हणून प्रत्यक्ष निवडणूक आणि उमेदवारीची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वी आपल्या साध्या आणि सरळ शैलीने पहिल्या टप्प्यात सुनेत्रा पवार यांनी बाजी मारल्याची चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघात दिसून येते.