मुंबई – बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केल्यानंतर पुष्पाचा सिक्वेल ‘पुष्पा-2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुष्पा या सिनेमामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदानाची जोडी सुपरहिट ठरलीच यासोबत या सिनेमाने सुद्धा बॉक्स ऑफीसचे सगळे रेकार्ड तोडले होते. प्रेक्षकांनी या सिनेमाला भरघोस प्रतिसाद दिला होता. या चित्रपटातील सगळी गाणी आज ही लोकांच्या तोंडात आहेत. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला नॅशनल पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

या चित्रपटातील अल्लू अर्जुनने साकारलेल्या पुष्पा या व्यक्तिरेखेसोबत रश्मिकाने साकारलेल्या श्रीवल्ली ही व्यक्तीरेखाही प्रेक्षकांना भावली होती. चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता रश्मिका मंदानाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘पुष्पा -2’ निर्मात्यांनी श्रीवल्लीचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

पोस्टरमध्ये श्रीवल्लीने साडी नेसील असून ज्वेलरी परिधान केली आहे. कपाळावर असलेल्या कुंकूने आणि गळ्यात असणाऱ्या मंगळसूत्राने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. रश्मिकाच्या डोळ्यात काहीसा आक्रमकपणा आहे. लोकांचे हृदय चोरणारी श्रीवल्ली उर्फ रश्मिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा अशी कॅप्शन देण्यात आली आहे. चाहत्यांकडून रश्मिकाच्या या लूकवर कौतुकाचा वर्षावर सुरू आहे.

या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘ या चित्रपटाचा टीझर 8 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. तसेच हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. श्रीवल्लीच्या फर्स्ट लूकसह निर्मात्यांनी ही माहिती दिली आहे. ‘पुष्पा 2’ मध्ये अल्लू अर्जुन, फहद फासिल, रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत