टोप (प्रतिनिधी) : सभासदांना चांगल्या प्रकारे सोयीसुविधा मिळण्यासाठी तसेच सभासदांचा विकास होण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीला पाठबळ द्या, असे आवाहन डॉ. कल्लैश्वर मुळीक यांनी केले. ते छ. राजाराम विकास सेवा संस्थेच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी नंदकुमार मिरजकर यांच्या सहकार्यातून गावात ‘केडीसीसी’ बँकेची शाखा आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माणिक पाटील यांनी सभासदांपर्यंत विविध योजना पोहोचवून शेतकरी सभासदांचा फायदा करुन देण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देऊन सभासदांच्या हक्काचे संचालक करा, असे आवाहन केले.

यावेळी सरपंच रुपाली तावडे, भगवान पाटील, तानाजी पाटील, नंदकुमार मिरजकर, बाळासो कोळी, विठ्ठल पाटील, विजयसिंह घोरपडे, गब्बर पाटील यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.