कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा एज्युकेशन सोसायटी संचलित, कळे विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज येथे इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजतर्फे आयोजित विज्ञान रथ प्रयोग प्रकल्पाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. क्लबच्या अध्यक्षा अर्चना चौगले आणि प्राजक्ता काळमकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण केली.
तमिळनाडू येथील रोटरी क्लब ऑफ विरुधनगरचे नामवंत विज्ञानप्रेमी नवीन कुमार आणि सतेश कुमार यांनी विद्यार्थ्यांना सोप्या पण प्रभावी प्रयोगांद्वारे विज्ञानाची मजा अनुभवायला दिली. त्यांनी आतापर्यंत भारतभरातील १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानाचे प्रयोग पोहोचवले असून, कळे येथील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला ही विशेष बाब ठरली. या उपक्रमातून प्रशालेतील ४०० पेक्षा अधिक विद्यार्थी लाभार्थी झाले आहेत. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचा अविस्मरणीय आणि सृजनशीलतेचा प्रवास ठरला.
यावेळी शिवसेना पन्हाळा तालुकाप्रमुख अरुण पाटील, प्राचार्य ए.बी.गायकवाड , विज्ञान शिक्षिका एस.एस.पेंढारकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.