मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री काही दिवस झाले चर्चेत आहे. पहिला हिरामंडीमध्ये दमदार अभियानयाने आणि आता तिच्या लग्नामुळे. सर्वत्र सध्या फक्त सोनाक्षीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. सोनाक्षी 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर लीक झाली आहे. झहीर – सोनाक्षी गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. झहीर इक्बाल यांच्या आधी सोनाक्षी अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत होती. आता सोनाक्षी सिन्हा हीच्या लग्नावर एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने भाष्य केलं आहे…

काय म्हणाला अर्जुन कपूर..?

एका मुलाखतीत अर्जुनला त्याच्या आणि सोनाक्षीच्या नात्याबद्दल विचारलं असता तो म्हणाला, काही नाती फार काळ टिकत नाहीत. काही नाती फक्त सिनेमांपर्यंत असतात. त्यानंतर लोकांचे मार्ग वेगळे होतात. मला सोनाक्षी आवडते. पण अनेकदा असं भासवण्यात येतं की, आमच्यामध्ये वाद आहेत. असं काहीही नाही. आम्ही एकमेकांना भेटतो. आमच्या दोघांवर देखील नातं टिकवण्यासाठी कोणता दबाव नाही…’अर्जुनने व्यक्त केलं की, त्याला अजूनही सोनाक्षीबद्दल खूप आदर आहे आणि असंही स्पष्ट केलं की, ते जेव्हा एकमेकांना इव्हेंटमध्ये भेटतात तेव्हा नातं चांगलं टिकून राहावं याच्या कोणत्याही दबावाशिवाय ते अगदी उत्तम प्रकारे एकमेकांना भेटतात.

सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर ‘तेवर’ या चित्रपटात एकत्र आले. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांना डेट करायला लागली. मिळालेल्या माहितीनुसार , त्यांच्या दोघांचे विचार वेगळे असल्यामुळे अर्जुन – सोनाक्षी यांचे मार्ग वेगळे झाले. सोनाक्षी प्रचंड इमोशनल मुलगी आहे. ती स्वतःच्या भावना लपवू शकत नाही. तर अर्जुन जास्त इमोशनल नाही. सोनाक्षीला सतत अर्जुन याच्यासोबत राहायचं होतं. पण अर्जुन याला सतत एकत्र राहायला आवडतं नव्हत.. सतत फोन करणं… हे देखील नातं तुटण्याचं कारण असल्याचं सांगितलं जात होतं.