कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची 150 वी जयंती गोवा राज्य सरकारसह लाईव्ह मराठी आणि प्रुडेंट मीडिया यांच्या माध्यमातून गोव्यात साजरी होत आहे. हा सोहळा रवींद्र भवन सांखळी येथे पार पडणार आहे. यात गोवा राज्य सरकार सहभागी होत असल्याने या जयंती सोहळ्याकडे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील असंख्य शाहू प्रेमींच लक्ष लागलं आहे.

या सोहळ्यात पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील अनेक मान्यवरांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात येणार येणार आहे. गोव्यातील सांखळी येथे पार पडणाऱ्या लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती दिवशी म्हणजेच 26 जून रोजी सकाळी दहा वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे

लाईव्ह मराठीच्या पुढाकाराने गोव्यात प्रथमच..!

लाईव्ह मराठीच्या पुढाकाराने गोव्यात प्रथमच राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी होत आहे. गोव्यातील आमचा सहकारी ग्रुप प्रुडंट मीडिया आणि गोवा राज्य सरकार यांच्या बहुमोल सहकार्याने हा कार्यक्रम  साजरा होत आहे. यामध्ये प. महाराष्ट्र तसेच कोकण परिसरातील मान्यवरांचा सत्कार सोहळा देखील होत आहे. संपूर्ण कोल्हापूरसाठी आणि लाईव्ह मराठी परिवारासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाला आपण उपस्थित रहावे ही विनंती.