कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून १ जून ते ६ जून पर्यंत कोरोना सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (मंगळवार) छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर करवते आणि आरोग्यदूत बंटी सावंत यांच्याकडे सँनिटायझर मशीन, सँनिटायजर, सिरीन, हॅन्डग्लोज, मास्क चे वाटप जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, केमिस्ट असोसिएशनचे मदन पाटील यांचे हस्ते सुपूर्त करण्यात आले. दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयातही या साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बबनराव राणगे, विजय आगरवाल, उत्तम जाधव, कादर मलबारी, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, मदन बागल, हेमंत घाग, महादेव पाटील, अवधूत पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते.