मुंबई – सध्या लोकसभेचं रणांगण सुरु आहे. त्यामुळे राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान अनेक गौफ्यस्फोट होत आहेत अनेक खुलासे होत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी माजी कृषिमंत्री आणि शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांसोबत विलीन होणार अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींदेखील प्रतिक्रिया देत श शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील” असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार..?

पंतप्रधान मोदी यांच्या एवढया मोठ्या ऑफर नंतर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले होते. आता यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे म्हणाले, नरेंद्र मोदींमुळे लोकशाही धोक्यात आहे, मोदींनी सोरेन आणि केजरीवाल यांना तुरुंगात टाकलंय. गांधी-नेहरुंची विचारधारा आम्हाला मान्य आहे. हा देश एकसंघ ठेवायचा आहे, त्यासाठी सर्वच धर्मांना सोबत घेऊन पुढे जावे लागणार आहे. पंतप्रधानांनी एका धर्माविषयी वेगळी भूमिका घेतल्याचं दिसून आलं. एका समाजाविरुद्ध वेगळी भूमिका मांडल्यास ऐक्य राहणार नाही, असे म्हणत शरद पवारांनी मोदींच्या ऑफरवर भाष्य केलं. लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात पवारांनी सांगितले. तसेच, ही मोदींची अस्वस्थता आहे, त्यातूनच ते अशी विधानं करत आहेत, अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची ऑफर धुडकावली. मोदींना जरी आमची गरज पडत असेल तरी आम्ही आमच्या बुद्धीला जे पटते, त्या आमच्या विचारांना सोडून कुठेही जाणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे