कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर पोलीस ठाणेचे सपोनि. दीपक भांडवलकर यांच्या खातेनिहाय चौकशीची करावी. अशी मागणी उंचगाव पूर्व (गणेशनगर, ता. करवीर) येथील नकुल शंकरराव पाटील यांनी जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांचेकडे केली. संबंधित तक्रारीची प्रत जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयाकडून गांधीनगर पोलीस ठाण्यास प्राप्त झाली.

त्यात म्हटले आहे की, उंचगाव पूर्व (गणेशनगर) येथील संदीप पाटील आणि गांधीनगर पोलीस ठाणेचे तत्कालीन सपोनि. उदय वसंतराव डुबल यांनी संगनमताने कागदपत्रामध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक करून हॉटेल संदीप, संदीप लॉजिंग आणि संदीप परमीट रूम-बियर बारला परवानगी  मिळवली होती. त्यासंदर्भात संदीप पाटील आणि उदय डुबल यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल होण्यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख यांच्याकडे नकुल पाटील यांनी अर्ज दिला होता. पण या प्रकरणाचा चुकीच्या पद्धतीने भांडवलकर तपास करत असून जिल्हा पोलीसप्रमुख व करवीरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची ते दिशाभूल करीत आहेत.  संबंधित बार, लॉजचा कशाप्रकारे त्रास होतो हे नोव्हेंबरपासून वारंवार नकुल पाटील यांनी निदर्शनास आणून देखील भांडवलकर यांनी कायदेशीर कारवाई केली नाही. लॉजमालकाला ते पाठीशी घालत आहेत.

याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक उदय डुबल यांचे म्हणणे अजूनही  घेतलेले नाही. उलट काही जणांकडून भांडवलकर निगेटिव्ह म्हणणे घेत आहेत त्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे, असा सवालही नकुल पाटील यांनी केला आहे. तसेच संबंधित प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.