टोप (प्रतिनिधी) : गेल्या पाच वर्षांत आ. सतेज पाटील, आ. विनय कोरे यांच्या सहकार्याने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून संभापूरला विकासकामांच्या जोरावर राज्यात लौकिक प्राप्त करून दिला. शिक्षण, पाणी, रस्ते, स्वच्छता, सुशोभीकरण आदी पायाभूत सुविधा निर्माण केल्या. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता जलजीवन मिशनमधून दोन कोटींची पाणी योजना मंजूर केली. तसेच व्यक्तिगत लाभाच्या योजना राबवित गावांत जनकल्याणकारी विकासाची गंगा आणल्याचे सरपंच प्रकाश झिरंगे यांनी सांगितले.

यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावांसाठी महिंद्रा ट्रॅक्टरचे लोकार्पण सोहळा व मसोबा मंदिर ते साळोखे माळ रस्त्यासाठी दहा लाख, गोंधळी टेक धणगर समाजपर्यंतचा काँक्रिट रस्ता व गटरसाठी २० लाख मंजूर झाले आहेत. गावात सीसीटीव्ही बसवणे, गंधर्व कॉलनी ते साळोखे माळ पिण्याच्या पाण्याची अंतर्गत पाईपलाईन, प्रकाश भोसले यांच्या घरापासून ते सुहास क्षीरसागर यांच्या घरापर्यंतच्या अंतर्गत पाईपलाईन, दुर्गामाता कॉलनी भूमिगत गटर्स व गावातील प्रत्येक कुटुंबाला डस्टबिन वाटप आणि विकासकामांचे उद्घाटन माजी सरपंच मारुती भोसले, लोकनियुक्त सरपंच प्रकाश झिरंगे, उपसरपंच धनश्री झिरंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी दिलीप ढिसले, बापूसो पावार, सर्जेराव भोसले, केरबा भासले, संपतराव कारंडे, सदस्या ज्योती भासले, स्वरुप भोसले, सर्जेराव माहिते, अरुण कांरडे, तानाजी भोसले, संजय कारंडे, सुनीता कांरडे, अवधूत झिरंगे, अरुण कारंडे, रावसो कारंडे, ग्रामसेविका आसमा मुल्लाणी व ग्रामस्थ उपस्थित होते.