कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आज (रविवार) पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय सर्वसाधारण सभेत मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील होते. यावेळी राज्य कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, सचिव प्रमोद जाधव, महिला राष्ट्रीय प्रतिनिधी कविता भोसले, अवधूत पाटील,सुहास निंबाळकर, मारुती मोरे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.