कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात युवासेना आणि कै. रामभाऊ चव्हाण दादा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गडकिल्ले स्पर्धेतील विजेत्यांना आज (गुरुवार) बक्षीस वितरण करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तर शिवसेना संपर्क प्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडला.

या स्पर्धेत जवळपास १०० हून अधिक किल्ले बनवणाऱ्या मंडळांनी सहभाग घेतला.       यामध्ये शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, कसबा बावडा, कदमवाडी, आपटेनगर, बुधवार पेठ, मुक्त सैनिक परिसरात मुलांनी किल्ले बनवले होते. काही मुलांनी तर चक्क छत्रपतींच्या काळातील वेषात माहिती सांगितली होती.

यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, ही स्पर्धा युवासेनेनी अखंडित सुरू ठेवावी.  प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये जाऊन महाराजांच्या गडकिल्यांची माहिती द्यावी.

मंजित माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खा. धर्यशील माने, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, माजी आ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेते : –

प्रथम क्रमांक -महाकाली भजनी मंडळ, किल्ला कुलाबा

द्वितीय -हिंदवी ग्रुप विचारे माळ किल्ला राजमाची

तृतीय – देखो ग्रुप मंगळवार पेठ, पन्हाळा

उत्तेजनार्थ -बाल मित्र वारीअर्स मुक्तसैनिक.. मुक्तसैनिक किल्ला पन्हाळा

उत्तेजनार्थ 2- न्यू ग्रुप महालक्ष्मी कॉलनी आपटे नगर शिवनेरी

बेस्ट परफॉर्मन्स पुढीलप्रमाणे : –

अभिदीप मित्र मंडळ, क. बावडा

खंडोबा तालीम मंडळ, (प्रतापगड)

विजेता तरुण मंडळ, क. बावडा

दत्त तरुण मंडळ, शिवाजी पेठ (राजगड)

साठमारी फ्रेंड्स सर्कल मंगळवार पेठ, (प्रचंडगड)