कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयीन कामकाज अपवाद वगळता बंद होते. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने १३ ऑगस्ट रोजी कोर्ट कामकाज पूर्ण क्षमतेने चालू करण्यास हायकोर्टाने परवानगी मागितली होती. याला हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे असून उद्या (मंगळवार) पासून जिल्ह्यातील कोर्ट कामकाज सकाळी साडेदहा ते सहा या वेळेत पूर्ण क्षमतेने चालू होणार आहे.

दरम्यान, जिल्हा न्यायालयामध्ये आपले काम असेल तेव्हांच आवश्यकता असेल तरच उपस्थित राहून कामकाज चालवणेचे आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन कोल्हापूर बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.