कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज दि. २७ ऑक्टोंबर २०२० ते दि. ०२ नोव्हेंबर २०२० या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आज (दिनांक) महावीर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी लेफटनंट उमेश वांगदरे यांनी उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार विरोधी शपथ दिली. ‘मी लाच घेणार नाही आणि देणार नाही, जनहितामध्ये काम करेन, व्यक्तीगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन आणि भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईन’, असा निर्धार यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे होते. शपथ कार्यक्रमाचे संयोजन लेफटनंट कर्नल संजीव सरनाईक यांच्या मार्गदशानाखाली लेफटनंट उमेश वांगदरे आणि प्रा. अश्विनी कोटणीस यांनी केले.