कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत लाभार्थी महिलांना कागदपत्र गोळा करण्यास काही प्रमाणात अडचणीत येत आहेत. याबाबत महिलांना या योजनेचा परिपूर्ण लाभ मिळावा आणि जेणेकरून लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागू नये. यासाठी कणकवली शहरात पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मदत कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

नलावडे म्हणाले की, कणकवली शहर भाजपच्या कार्यालयात हा कक्ष सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहे. या ठिकाणी या लाभार्थ्यांना आवश्यक असणारे दाखले संबंधित प्राधिकरणाकडून घेऊन देण्यात येणार आहेत. शहरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हे पाऊल उचलल्याची माहिती समीर नलावडे यांनी दिली.

दरम्यान कणकवली शहरातील ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. अशा महिलांनी कणकवली शहर भाजप कार्यालय कंझ्यूमर्स सोसायटी जवळ दिलेल्या वेळेत आपल्या कागदपत्रांसह उपस्थित राहत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नलावडे यांनी केले आहे.