मुरगूड (प्रतिनिधी) : देशाचे नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त मुरगूड शहर राष्ट्रवादीच्या वतीने मुरगूड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटण्यात आली. घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आली. मुरगूड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी मुश्रीफ म्हणाले की, शरद पवार यांनी २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण ही शिकवण आम्हा सर्वांना दिली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन याच खऱ्या त्यांना शुभेच्छा आहेत.

यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य राजू आमते, डॉ. सुनील चौगुले, गणपतराव मांगोरे, अमर देवळे, प्रणव बोरगावे, अमित तोरसे, लक्ष्मण चौगले, प्रा. चंद्रकांत जाधव, निवृती आसबे, किरण चौगले आदीसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.