कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तहसील कार्यालयामध्ये सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी दाखल्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तहसिलदार दिक्षांत देशपांडे यांनी लाभार्थ्यांना गावपातळीवर उत्पन्नाचे दाखले मिळावेत यासाठी प्रत्येक सजेत तलाठ्यांना नोंद घालून पंचनामा करून त्याच्यावर उत्पन्नाची नोंद घालावी असे आदेश दिले आहेत.

तसेच सर्व तलाठ्यानी उशिरापर्यंत आपल्या मुख्यालयात थांबण्याच्या सूचना देखील देशपांडे यांनी दिल्या आहेत. तर गावाच्या जवळील असणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रांमध्ये हे उत्पन्नाच्या दाखल्याचे अर्ज लाभार्थ्यांनी जमा करावेत. जेणेकरून लाभार्थ्यांचा वेळ वाचेल आणि त्यांना दाखले देखील तत्परतेने उपलब्ध होतील. असे नियोजन महसूल विभागाकडून करण्यात आल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

त्यामुळे खालील टिलेल्या आपल्या गावातील किंवा नजीकच्यामहा-ई-सेवा केंद्रांवर आपण जाऊन आपला उत्पन्न दाखला काढता येणार आहे.

खारेपाटण भूषण कांबळे 9209637292, तरळे – गौरी माळवदे 7888171017, साक्षी सुर्वे 9834915672, नांदगाव – रामचंद्र लोके-9730308057, फोंडाघाट- गणेश तेली-9420154648, तरंदळे- विवेक सावंत-7507458720, ओसगाव – प्रवीण नाईक-9823400472, सांगवे – मंगेश कुलकर्णी- 9421975145, नरडवे -लक्ष्मण ढवळे 9405331719, वागदे- गणेश पारकर 9561481418, कणकवली सुप्रिया बिडये-7350234366, कणकवली मंगेश सावंत- 9421267162 असे आहेत.

या महा-ई-सेवा केंद्रांवर आपण उत्पन्न दाखला अर्ज घेऊन तलाठ्याकडे आपल्या उत्पन्नाची नोंद करून तो पुन्हा अर्ज त्याच महा ई सेवा केंद्रामध्ये जमा करावेत. अशा सूचना तहसीलदार देशपांडे यांनी दिल्या आहेत. यासोबत वय अधिवास दाखल्यासाठी अनेक अर्जधारकांना जन्म दाखला नसल्याची अडचण भासत होती. मात्र ही अडचण आता दूर होणार असून जन्म दाखला नसल्यास त्याऐवजी शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत या अर्जासोबत जोडल्यास ती देखील चालणार आहे.

तसेच हे दोन्ही कागदपत्र नसल्यास पंधरा वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याचा अन्य पुरावा जोडल्यास तो देखील चालणार असल्याचे तहसिलदार देशपांडे यांनी सांगितले.