कळे (प्रतिनिधी) : संपूर्ण जगभरात शैक्षणिक, सामाजिक कार्य करणारी अग्रगण्य संस्था रोटरी क्लब ऑफ करवीर मार्फत भैरव विद्यानिकेतन आसगाव (ता. पन्हाळा) या शाळेत या क्लबचा पदग्रहण सोहळा पार पडला. या पदग्रहण सोहळ्यात रोटरी क्लब करवीरचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी यश पोहाळकर यांची अध्यक्ष व रेहान तरठे यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली. या कार्यक्रमात रोटरीचे सचिव स्वप्नील कामत, दिलीप शेवाळे, श्रीकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी साहिल पाटील, यश कागले, अथर्व पाटील, साई पाटील, श्रीदत्त चौगले, अथर्व पाटील व ह्रदवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी दिलीप प्रधाने, निशिकांत नलवडे, नवीन पटेल, शीतल दुग्गे, अंकुश कारंडे, मुख्याध्यापक अरुण सुतार, किरण काळे, सागर पाटील, सौरभ पाटील, विजय भोसले, राणी पाटील, माळवी, सुरेखा पाटील, स्वप्नजा शिंदे, बाजीराव आरडे, संकेत मोरे, महेश पाटील, रोहन मोळे यांचे मार्गदर्शन लाभले.