मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे जवळपास दीड वर्षे राज्यभरातील सर्व शाळा बंद होत्या. परंतु कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने आजपासून (सोमवार) शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं विद्यार्थ्यांनी गजबजून गेली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. 

मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षकांनी आरोग्याबाबत शंका आली तर त्यांनी कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. ऋतू बदलत असतांना साथीचे रोग येत असतात. त्यामुळे या दरम्यान करोना तर आला नाही ना, याची खात्री करुन घेणे महत्वाचे आहे. तसेच शिक्षकांनी काळजी घ्यावी की शिक्षणाची जागा, वर्ग बंदिस्त नसायला हवे, ते उघडे असायला हवे. दारं, खिडक्या उघड्या असायला हव्या, जशे हसते खेळते मुलं तशी खेळती हवा वर्गात राहायला हवी. तसेच सोशल डिस्टंगिंचे पालन करणे, स्वच्छता राखणे महत्वाचे आहे.”

कोरोनाने आपल्याला काय शिकवलंय याचा अंदाज घेऊन पुढचं आयुष्य आरोग्यदायी व्हावं. हीच जबाबदारी सरकारची आहे. एकदा उघडलेले शाळा बंद होणार नाहीत, या निर्धाराने आजपासून या नवीन आयुष्याची आपण सुरवात करु, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नियम काय?

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांची मंजुरी घेणे आवश्यक असेल.

विद्यार्थ्यांनी उपस्थिती मोठी असल्यास एक दिवस आड सुरु राहतील.

एका दिवशी १५ ते २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात यावा.

एका बाकावर एकच विद्यार्थी बसवणे.

सोशल डिस्टन्सिंग राखणे.

मास्क घालणं, तसेच सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असेल.