कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील कुंभी नदीमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने प्रात्यक्षिक घेतली. यावेळी महापूराच्या काळात राबविण्यात येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांना महापुराचा सामना करावा लागतो. यावर्षी पुन्हा तशी परिस्थिती उद्भवल्यास या नैसर्गिक आपत्तीला कसे सामोरे जावे, याबाबत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी कळे परिसरातील नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने बोट कशी चालवली जाते, पुरामध्ये अडकलेल्या नागरीकांना बाहेर कसे काढायचे, पाण्याचा प्रवाह आणि इतर अनेक गोष्टींबाबत  जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने  मार्गदर्शन करण्यात आले. 

यावेळी कळे मंडळ अधिकारी सुरेश ठाकरे, तलाठी संदीप कांबळे, भिकाजी काळे, बाजीराव पोवार, नागरिक उपस्थित होते.