कोल्‍हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) संघाचा हिरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या अद्यावत लोणी व पेढा निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नाम.अजित पवार यांच्या शुभहस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीमुळे अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. अनेक मोठमोठ्या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गाचे वरदान असून गोकुळ सारख्या संस्थांनी सहकारावर एक आढळ श्रद्धा ठेवून जिल्ह्याच्या राज्याच्या तसेच देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.

गोकुळने दूध उत्पादकांना चांगला दूध दर देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या प्रगतीत मोलाची अशी भर घातली आहे. महाराष्ट्राच्या धवलक्रांतीमध्ये गोकुळचे फार मोठे योगदान असून सहकारामध्ये गोकुळ उत्तम पद्धतीचा काम करणारा एक आदर्श दूध संघ आहे. आज हिरक महोत्सवाच्या निमित्ताने एक महत्त्वाचा टप्पा गोकुळ दूध संघाने गाठलेला असून हे अभिमानास्पद असल्याचं ही ते म्हणाले

या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नाम.अजितदादा पवारसो, वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, चेअरमन अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.