रांगोळी (प्रतिनिधी) : इचलकरंजी  येथील श्री शिवतीर्थचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते  मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. हा दैदिप्यमान लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. लाखोंच्या संख्येने शिवभक्त इचलकरंजी नगरीमध्ये सोहळ्यासाठी दाखल झाले होते. भव्य मिरवणूक, ढोल पथकाचा नाद, तुतारीचा आवाज आणि ‘जय भवानी जय शिवराय’ या जयघोषाने संपूर्ण इचलकरंजी परिसर दुमदुमून गेला होता.

अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य शिवतीर्थाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी छत्रपतींना वंदन करून आदरांजली वाहिली व उपस्थित जनतेला संबोधित केले. मोठ्या डौलाने फडकणारा भगवा छत्रपतींच्या स्वराज्याची साक्ष देत होता. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थित असणारा प्रत्येकजण या शिवमय वातावरणामध्ये मंत्रमुग्ध झाला होता.

यावेळी इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी,  आमदार प्रकाश आवाडे,  माजी आमदार सुरेश हाळवणकर,  पुंडलिकराव जाधव,  राहुल आवाडे,  तानाजी पोवार  सर्व नगरसेवक,  नगरसेविका आदी  उपस्थित होते.