कुडाळ ( प्रतिनिधी ) अणाव ता. कुडाळ जिल्हा सिंधुर्गच्या माजी सरपंच अक्षता अरुण दळवी (वय 46 वर्षे ) यांचे मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी रात्री 9-०० वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने कर्जत येथील राहत्या घरी निधन झाले. अक्षता दळवी व्यवसायानिमित्त कर्जत येथे राहत होत्या. तिथे त्यांनी सेतु सुविधा केंद्र सुरू केले होते.

त्यांच्या पश्चात पती अरूण दळवी, मुलगा, दोन दीर, जाऊ, पुतणे, पुतणी असा परिवार आहे. लाईव्ह मराठी चे पत्रकार गुरुप्रसाद दळवी व रिक्षा व्यावसायिक बाळू दळवी यांच्या त्या वहिनी होत.