कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मुदतीपूर्व बदलीच्या निषेधार्थ आज (शनिवार) शिवाजी चौकात नागरिकांच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी ‘आयुक्त साहेब परत या,  कोल्हापूरला तुमची गरज आहे, आयुक्तांची बदली करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो….आयुक्तांची बदली रद्द झालीच पाहिजे अशा घोषणांनी शिवाजी चौक परिसर दणाणून गेला.

या आंदोलनात संदीप देसाई, गिरीश फोंडे, निलेश रेडेकर, उत्तम पाटील, गीता हसुरकर, अमरजा पाटील, सूरज सुर्वे, रुपेश पाटील, अमोल बुड्डे, मोईन मोकशी, लखन काझी, संपदा मुळेकर, गीता डोंबे, अवधूत भाटे, संजय साडविलकर, नीता पडळकर, रसिका गोळे, संतोष घाटगे, पंकज खोत यांच्या सह कोल्हापूरातील नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या.