मुंबई – लोकसभा मतदानाला जसजशी सुरुवात झालीय. तसतशी विरोधक आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत . देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून दिल्ली जाण्याचा शब्द दिला होता. मात्र तो पाळला नाही, असा दावा काल उद्धव ठाकरेंनी केला होता . आता त्यांच्या या दाव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे. तर आदित्य ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री काय मंत्रीही कुणी केलं नसतं, आदित्य ठाकरेंची लायकी काय? अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंची लायकी काढलीये.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे..?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले , चंद्रशेखर बावनकुळेदेशातील १४ कोटी जनतेचं जगातील कोणत्याही एजन्सीमार्फत सर्वेक्षण केलं तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीत टॉपवर आणि क्रमांक एकवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून संवेदनशील नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे. दुसरं नालायक लोकांचं सर्वेक्षण केलं तर सर्वात टॉपवर आणि पहिल्या नंबरवर निष्क्रीय आणि नापसंत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे दिसतील. उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ माहिती असेलच, अडीच वर्ष खिशात पेन नसताना मुख्यमंत्री, अडीच वर्ष विधानसभेत दोनदाच आलेला मुख्यमंत्री… असा कार्यकाळ त्यांचा जनतेने पाहिला आहे. त्यामुळे नापसंत आणि निष्क्रीय मुख्यमंत्री आहेत. ते मनोरूग्णासारखे वागताय त्यांची मानसिक स्थिती ढासळली, असल्याचे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांचे ताशेरे ओढले आहेत. तर आदित्य ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री काय मंत्रीही कुणी केलं नसतं, आदित्य ठाकरेंची लायकी काय? असा सवाल करत त्यांनी आदित्य ठाकरेंची लायकी काढलीये. आता यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे काय उत्तर देतात या आकडे सर्वांच लक्ष लागून राहीले आहे.

देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरे यांना आश्वासन

देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंबाबत आश्वसन दिल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला. “मी माझ्या वडिलांना शब्द दिला होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होईल. अडीच-अडीच वर्षांसाठी शिवसेना व भाजपाचा मुख्यमंत्री होईल, हे अमित शाहांसोबतच्या चर्चेत ठरलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की ते माझा मुलगा आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतील आणि ते स्वत: दिल्लीत जातील. पण त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं ठरवलं”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे