कोल्हापूर (प्रतिनिधी) : २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय, नेहरू युवा केंद्र-पंतजली योगपीठ, कोल्हापूरच्या यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.

आज सकाळी आयुष मंत्रालयाचा कॉमन योगा, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडुंची प्रात्यक्षिके केली. तसेच नेहरु युवा केंद्रामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच योगासन राज्य क्रीडा मार्गदर्शक रविभूषण कुमठेकर यांनी उपस्थितांकडून योगा प्रोटोकॉल करुन घेतला. राष्ट्रीय योगपट्टू कु. गार्गी भटने रिदमिक योगाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील आर्या पाटील, दिव्यांशी पाटील, इशिता पाटील, मृण्मयी करंदीकर, सोहम गाडगीळ यांनी ग्रुप योगाची प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, तहसिलदार कैलास कणसे, महेश चोपडे, पूजा सैनी, सचिन चव्हाण सुधाकर जमादार, बालाजी बरबडे, रोहिणी मोकाशी, प्रविण कोंढवळे, कृष्णात पाटील, सागर जाधव आदी उपस्थित होते.