संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

मुंबई (प्रतिनिधी) : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठवले आहे. अटक केल्यानंतर पहिल्यांदा राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती. पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्याने… Continue reading संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी

काँग्रेसतर्फे उद्या राजभवनला घेराव : नाना पटोले

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तूंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पाहात आहे. महागाई, बेरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. म्हणून उद्या शुक्रवार, ५ ऑगस्ट रोजी राजभवनला घेराव घातला जाणार असून, त्यानंतर जेलभरो करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे… Continue reading काँग्रेसतर्फे उद्या राजभवनला घेराव : नाना पटोले

सरन्यायाधीशपदी कोकणच्या सुपुत्राला मिळणार मान

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व्ही रमण्णा यांनी देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची आज शिफारस केली आहे. म्हणून आता देशाच्या सरन्यायाधीशपदी आता पुन्हा एकदा मराठी माणूस विराजमान होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भावी सरन्यायाधीश असलेले न्यायमूर्ती लळीत हे मूळचे कोकणातील आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये हे त्यांचे मूळ गाव.… Continue reading सरन्यायाधीशपदी कोकणच्या सुपुत्राला मिळणार मान

शिंदे-फडणवीस सरकारचा उद्या शपथविधी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी उद्या (शुक्रवारी) होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मंत्रिमंडळात भाजपाचे आठ, तर शिंदे गटाचे सात आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे. आता या १५ जणांमध्ये कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीककडे शिवसेनेतील वाद सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरवाजात पोहोचला आहे, तर दुसरीकडे राज्यात ३०… Continue reading शिंदे-फडणवीस सरकारचा उद्या शपथविधी

मोटार वाहन विभागासाठी नवीन ४४३ नियमित पदाची निर्मिती

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या मोटार वाहन विभागासाठी ४३५० पदांच्या सुधारित आकृतीबंधानुसार नवीन ४४३ नियमित पदे निर्मिती करण्यात येणार असून, यामध्ये सहपरिवहन आयुक्त या संवर्गातील ५ नियमित पदांचा देखील समावेश असणार आहे. सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवरील खर्चाचा भारही कमी होणार आहे.… Continue reading मोटार वाहन विभागासाठी नवीन ४४३ नियमित पदाची निर्मिती

महापालिका निवडणुकीसाठी २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना, शिवसेनेला धक्का

मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे सरकारने उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला असून, आता २०१७ सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मविआ सरकारच्या काळात वाढवलेली वॉर्डरचना रद्द करण्यात आली असून, यामध्ये मुंबईतील वाढलेल्या ९ वॉर्डचा समावेश आहे. आज (बुधवार) झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय… Continue reading महापालिका निवडणुकीसाठी २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना, शिवसेनेला धक्का

गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे

मुंबई (प्रतिनिधी) : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सात वर्षांनी एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. बुधवारी बॉम्बे हायकोर्टाच्या संमतीने एसआयटीकडून एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. एसआयटीतले काही अधिकारी एटीएसला त्यांच्या तपासात सहकार्य करणार आहे. २०१५ पासून एसआयटीला पानसरे हत्या प्रकरणात अपेक्षित यश मिळत नसल्याने हा तपास एटीएसकडे सोपवण्यात यावा, अशी विनंती पानसरे कुटुंबाने केली होती.… Continue reading गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे

रविवारपर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागणार

मुंबई : राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. अशात हवामान खात्याकडून पावसाचा नवा अंदाज देण्यात आला आहे. पुढचे ४ दिवस राज्यात असेच हवामान राहील; पण रविवारी अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना रविवारपर्यंत उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. हवामान खात्याने सांगितले की, मुंबईत काही… Continue reading रविवारपर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागणार

संजय राऊत यांना गुरुवारपर्यंत ईडीची कोठडी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाने  गुरुवार, दि. ४ ऑगस्टपर्यंत अर्थात चार दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राऊत यांना आता ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे. पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीने रविवारी तब्बल ९ तास संजय राऊत यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची… Continue reading संजय राऊत यांना गुरुवारपर्यंत ईडीची कोठडी

नड्डा यांचे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे : उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्रातील शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे’ हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी केलेले वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे. देशातील सर्वच लोकांनी आपले कान, डोळे उघडे ठेवून देश कुठे चालला आहे, हे पहायला हवे. देशाला हुकूमशाहीकडे नेण्यासाठी भाजपला मदत करायची की नाही, यावर सामान्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव… Continue reading नड्डा यांचे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे : उद्धव ठाकरे

error: Content is protected !!