रिक्षाचालक ते मुख्यमंत्री- एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास

मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे. एक रिक्षाचालक असणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून बंड केले. त्यावेळी त्यांच्यावर अनेकांनी टिकास्त्र सोडले होते; पण आता देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा करत मास्टरस्ट्रोक खेळला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या… Continue reading रिक्षाचालक ते मुख्यमंत्री- एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक

मुंबई (प्रतिनिधी) एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी धक्कादायक घोषणा गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस आणि शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फडणवीस यांनी आपण स्वत: मंत्रिमंडळाबाहेर राहणार असल्याचे जाहीर केले. शिंदे यांना मुख्यमंत्री करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देत फडणवीस… Continue reading एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक

…तर ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो : राज ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : ‘एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चे कर्तृत्व समजू लागतो. त्या दिवसापासूनच त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो’, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विटरवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी आपली… Continue reading …तर ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो : राज ठाकरे

शिवसेनेला संपविण्याचा दोन्ही काँग्रेसचा प्रयत्न सुरु होता : केसरकर

मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबतची युती तोडली तर आम्ही त्यांच्याशी बोलायला तयार होतो; पण तरीही ते दोन्ही काँग्रेससोबत आहेत. ठाकरेंविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात  गेलो नाही. उद्धव ठाकरेंबद्दल अजूनही आदर आहे. आम्ही ठाकरे कुटुंबाच्या विरोधात नाही. शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रयत्न सुरु होता, असा थेट आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर… Continue reading शिवसेनेला संपविण्याचा दोन्ही काँग्रेसचा प्रयत्न सुरु होता : केसरकर

नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाच्या रचनेची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आले. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतले आहेत. तत्पूर्वी आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ कसे असेल याची आता चर्चा सुरु झाली आहे. यावर ट्वीटद्वारे  स्पष्टीकरण देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे… Continue reading नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाच्या रचनेची चर्चा

विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे ?

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे नव्या सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड होणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपद अजित पवार यांच्याकडे येणार की जयंत पाटील यांच्याकडे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी… Continue reading विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे ?

राज्यातील सत्तानाट्याचा घटनाक्रम

मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने सुरू झालेले महाराष्ट्रातील सत्तानाट्य बुधवारी रात्री संपुष्टात आले. विधानपरिषदेच्या निवडणूक निकालानंतर शिंदे यांनी रात्रीतूनच बंडखोर आमदारांसह महाराष्ट्र सोडला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाने नऊ दिवस शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्षाचे राजकीय नाट्य पाहिले. महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचे केंद्र सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी असे सरकत गेले आणि उद्धव ठाकरेंच्या… Continue reading राज्यातील सत्तानाट्याचा घटनाक्रम

औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ नामांतराचा प्रस्ताव मंजूर

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबादसह नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचे प्रस्ताव शिवसेनेकडून ठेवले गेली. या प्रस्तावाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे ‘धाराशीव’ असे नामकरण होणार आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील हे नाव आता देण्यात येणार आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर… Continue reading औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’ नामांतराचा प्रस्ताव मंजूर

उद्धव ठाकरे वाजपेयींचा कित्ता गिरवणार ?

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण विश्वासदर्शक ठरावात पराभूत होण्याची कुणकूण लागली आहे. त्यामुळे जर बुधवारी सायंकाळी सुप्रीम कोर्टाचा निकाल शिवसेनेच्या विरोधात लागला आणि उद्या गुरुवारी बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास मुख्यमंत्री ठाकरे फ्लोअर टेस्ट न करता थेट भाषण करून राजीनामा देण्याची शक्यता आहे. सध्याची स्थितीत पाहता शिंदे गट वेगळा गेल्यामुळे राज्यातील महाविकास… Continue reading उद्धव ठाकरे वाजपेयींचा कित्ता गिरवणार ?

विश्वासदर्शक ठरावासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी : भाजप

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून भाजपनेही जोरदार तयारी चालवली आहे. विधान भवनातील व्यवस्थेसंदर्भात भाजपचे प्रवीण दरेकर व सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व विधान भवन सचिव राजेंद्र भागवत यांची भेट घेतली. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, प्रवीण दरेकर आणि मी… Continue reading विश्वासदर्शक ठरावासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी : भाजप

error: Content is protected !!