शेअर बाजारात घसरण; गुंतवणूकदारांच्या ६.५ लाख कोटींचा चुराडा

मुंबई : आजचा दिवस शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. सेन्सेक आज शेअर बाजारात ८७२ अंकांनी घसरला, तर निफ्टीही २६८ अंकांनी घसरला. सलग दोन सत्रांत शेअर बाजारात घसरण झाल्याने त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला. सलग दोन सत्रातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या ६.५ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेड त्याच्या व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा… Continue reading शेअर बाजारात घसरण; गुंतवणूकदारांच्या ६.५ लाख कोटींचा चुराडा

संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई (प्रतिनिधी) : गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणामध्ये अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीच्या विशेष न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज राऊतांना ‘बेल की जेल’ याकडे सर्वांचे लक्ष लागले होते; मात्र आजही राऊतांना दिलासा मिळालेला नाही. आज झालेल्या सुनावणीमध्ये संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे… Continue reading संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला

विनोदवीर राजू श्रीवास्तव ब्रेन डेड

मुंबई : जीवन-मृत्यूची झुंज देणाऱ्या विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने  डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांना ब्रेन डेड घोषित केले आहे. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी सध्या चाहते अविरत प्रार्थना करत आहेत. कुटुंबीय, चाहते, मित्रपरिवार प्रत्येकजण त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे. गेल्या नऊ दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.… Continue reading विनोदवीर राजू श्रीवास्तव ब्रेन डेड

बोरिवली पश्चिममध्ये चार मजली इमारत कोसळली

मुंबई : बोरिवली पश्चिम भागामध्ये शुक्रवारी दुपारी चार मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती; मात्र यात कोणीही अडकले नसल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. येथे मदतकार्य देखील सुरु करण्यात आले आहे. मुंबईत सर्वत्र दहीहंडीचा उत्साह शिगेला असताना बोरिवली पश्चिमेला असलेल्या साईबाबा… Continue reading बोरिवली पश्चिममध्ये चार मजली इमारत कोसळली

जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार

मुंबई (प्रतिनिधी) : आज राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून, या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्याबाबतची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा विधानसभेत केली होती. त्यानुसार नगरविकास, वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचे शासन निर्णय तातडीने जारी केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्दैवाने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा… Continue reading जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार

गोविंदा आला रे..राज्यभर दहीहंडीचा उत्साह  

मुंबई : राज्यात आज तब्बल ३ वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. गुरुवारी रायगडमध्ये संशयास्पद बोट आढळल्यामुळे राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्वच संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. सकाळपासूनच मुंबई, ठाणे परिसरात दहीहंडी उत्सवाला जोरदार सुरूवात झाली आहे. मुंबईत १२ गोविंदा जखमी मुंबईत दहीहंडी… Continue reading गोविंदा आला रे..राज्यभर दहीहंडीचा उत्साह  

समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात समीर वानखेडे यांनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. समीर वानखेडे यांना सोशल मीडियावरून धमक्या देण्यात आल्या आहेत. समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यापासून धमक्या येत आहेत. ट्विटरवर ही धमकी आल्याचे तक्रारीत… Continue reading समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी

‘बाईपण भारी देवा’चे मोशन पोस्टर प्रदर्शित

मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे तब्बल तीन वर्षांच्या गॅपनंतर एक नवीन कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. ‘बाईपण भारी देवा’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. आज गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले असून, चित्रपटाची प्रदर्शित करण्याची तारीखही जाहीर केली आहे. पुढील वर्षी ६ जानेवारी रोजी हा… Continue reading ‘बाईपण भारी देवा’चे मोशन पोस्टर प्रदर्शित

विधानसभेत अजित पवार आक्रमक, शंभूराज देसाईंना फटकारले

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले. अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणाणाऱ्या मंत्री शंभूराज देसाई यांनाही त्यांनी चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळाले. आपण कॅबिनेटमध्ये एकत्र… Continue reading विधानसभेत अजित पवार आक्रमक, शंभूराज देसाईंना फटकारले

बॉक्स ऑफिसवर आमीर-अक्षय कुमार फेल

मुंबई :  आमीर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट प्रदर्शित झाले. परंतु, दोघांचेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करु शकली नाही; परंतु या दोन्ही दिग्गजांना पछाडून साऊथ सिनेमाने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला सीता-रामम हा दक्षिणेकडील चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. एवढेच नव्हेतर तरुण वर्ग या… Continue reading बॉक्स ऑफिसवर आमीर-अक्षय कुमार फेल

error: Content is protected !!