इंदापूर तालुक्यात विमान कोसळून पायलट जखमी

पुणे (प्रतिनिधी) : पुणे  जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे आज (सोमवार) शिकाऊ विमान कोसळले. या विमानाने बारामतीतून उड्डाण केले होते. या अपघातात पायलट युवती किरकोळ जखमी झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे मान कोसळल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सुदैवाने हे विमान शेतात कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. यापूर्वी ५ फेब्रुवारी २०१९ मध्ये तालुक्यातील रुई गावात विमान कोसळले… Continue reading इंदापूर तालुक्यात विमान कोसळून पायलट जखमी

जयगडजवळ समुद्रात सिंगापूरचे तेलवाहू बार्ज उलटले

रत्नागिरी : तालुक्यातील जयगडजवळ समुद्रात मंगळवारी सकाळी एक सिंगापूरचे तेलवाहू बार्ज उलटले असून, त्यामुळे समुद्र किनारा परिसरात तेलाचा तवंग पसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. समुद्र किनारी वाहून येणाऱ्या कोणत्याही वस्तूंना हात न लावण्याच्या सूचना तटरक्षक दलाकडून देण्यात आल्या आहेत. मंगळवारी सकाळी सिंगापूर कंपनीचे मोठे तेलवाहू बार्ज बुडत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. हे बार्ज सिंगापूरचे… Continue reading जयगडजवळ समुद्रात सिंगापूरचे तेलवाहू बार्ज उलटले

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये एस.टी. बस कोसळून १३ ठार

इंदौर (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील इंदूर-खरगोनदरम्यान सोमवारी सकाळी मोठा अपघात झाला. इंदौरहून पुण्याला जाणारी बस सकाळी १०.४५ वाजता धामनोद येथील खलघाटाजवळ नर्मदा नदीत पडली. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ५० ते ५५ प्रवासी होते. आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामध्ये ७ पुरुष आणि ४ महिलांचे मृतदेह आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली… Continue reading मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये एस.टी. बस कोसळून १३ ठार

राजापूरचा तरुण अपघातात ठार

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : अकिवाट, ता. शिरोळ दरम्यानच्या मजरेवाडी रस्त्यावर दुचाकी व अशोक लेलँड टेम्पोने दोन दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात संतोष रविकांत कारदगे (वय ३८, रा. राजापूर, ता. शिरोळ) हा तरुण जागीच ठार झाला, तर दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जयसिंगपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संतोष शंकर धारणगुत्ते, संदीप महादेव… Continue reading राजापूरचा तरुण अपघातात ठार

शिरोली एमआयडीसीमध्ये ट्रक लाईटच्या डिपीवर धडकलाआणि..!

टोप (प्रतिनिधी) : शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत कच्चा माल घेवून आलेला मालवाहू ट्रक अचानक हाय व्होल्टेज असणाऱ्या लाईट खांबाच्या डिपीवर धडकला. सुदैवाने समोर कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. पण परिसरातील लाईट गेल्याने कंपन्या काहीकाळ बंद झाल्या. काॅस्प्रो मेटल ते परमार पेट्रोल पंम्प रोडवर असणार्या दत्त एंटरप्राइजेस कंपनीच्या शेजारील हाय होलटेज लाईटच्या डिपीवर टेम्पो ट्रक… Continue reading शिरोली एमआयडीसीमध्ये ट्रक लाईटच्या डिपीवर धडकलाआणि..!

किणी टोल नाक्याजवळ विचित्र अपघातात तीन ठार

टोप, कुंभोज (प्रतिनिधी) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्याजवळ महामार्गावर नादुरुस्त होऊन थांबलेल्या कंटेनरला पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारची धडक झाली आणि याच कारला पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिल्याने या विचित्र अपघातात कारमधील तिघेजण ठार झाले, तर एक महिला जखमी झाली आहे. अपघातात ठार झालेले तिघेही कर्नाटकातील बंगळुरू येथील आहेत. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री झाल्याचे… Continue reading किणी टोल नाक्याजवळ विचित्र अपघातात तीन ठार

आजऱ्यात दोन घरांना आग, साडेपाच लाखांचे नुकसान

आजरा (प्रतिनिधी) : शहरातील मध्यवस्तीमधील सुतार गल्लीत मरगुबाई मंदिराशेजारच्या दोन घरांना शनिवारी रात्री आग लागली. या आगीमध्ये सुतार बंधूंच्या मशीनरीसह तयार केलेल्या फर्निचर, घराचे आणि प्रापंचिक साहित्य मिळून सुमारे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. येथील नरेंद्र मनोहर सुतार यांच्या वर्कशॉपबरोबरच अमर शिवाजी सुतार आणि हणमंत सुतार या सुतार कुटुंबीयांच्या घरांना आग लागल्याने… Continue reading आजऱ्यात दोन घरांना आग, साडेपाच लाखांचे नुकसान

ट्रकच्या धडकेत उचगावचा दुचाकीस्वार ठार

टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील टोप चौकात दुचाकीवरून रस्ता ओलांडणाऱ्या उचगाव येथील युवकाचा आयशर ट्रकने धडक दिल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत विशाल रामा वाळकुंजे ( वय १९) हा उचगाव येथील रहिवासी असून, तो कामानिमित्त टोप येथील बिरदेव मंदिर परिसरात आपल्या नातेवाइकांकडे आला होता. आपले काम उरकून तो उचगावकडे जाण्यासाठी रविवारी दुपारी ४… Continue reading ट्रकच्या धडकेत उचगावचा दुचाकीस्वार ठार

नुपूर शर्मा विरोधात देशभर निदर्शने, आंदोलनाला हिंसक वळण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात देशभर संतापाची लाट उसळली असून, उत्तर प्रदेशसह इतर राज्यातही ठिकठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. बहुतांश ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद, सोलापूर आदी ठिकाणी मुस्लिम समाजाने मोर्चा काढून… Continue reading नुपूर शर्मा विरोधात देशभर निदर्शने, आंदोलनाला हिंसक वळण

वाडीचरण येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथे आज (सोमवार) वाडीचरण येथे एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये त्या वाहनधारकाला आपला पाय गमवावा लागला आहे. आकाश अशोक चोपडे (वय ३०, रा. सागांव, ता. शिराळा, जि. सांगली) असे त्यांचे नाव असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश चोपडे आणि त्यांचे मित्र मयूर मंगेश कांबळे… Continue reading वाडीचरण येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक…

error: Content is protected !!