कागल-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर दिसली वर्दीतली माणुसकी..!      

कोल्हापूर:आज सोमवार दि 16 सप्टेंबर सकाळी पावणे अकरा वाजताची वेळ होती.कागल- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मयूर पेट्रोल पंपाजवळ एका आयशर ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेत डोक्यासह चेहऱ्याला जोरदार मार लागल्यामुळे तो अज्ञात पादचारी गंभीर जखमी झाला व बेशुद्ध अवस्थेत गेला. जवळच असलेल्या हायवे पोलीस मदत केंद्राला कुणीतरी माहिती दिली आणि अगदी सहाव्या… Continue reading कागल-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर दिसली वर्दीतली माणुसकी..!      

कोल्हापुरात फटाक्याचा भडका : चार जखमी

कोल्हापूर – शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे फटाके उडवताना उडालेल्या आगीच्या भडक्यात 4 लहान मुले जखमी झाली आहेत. या मुलांना चेहऱ्यासह हाता- पायावर देखील भाजले आहे. गणेशविसर्जन मिरवणुकीत अनेक वेगवेगळ्या फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. त्या फटाक्यांची उर्वरित कचरा अजूनही रस्त्यावर पडलेला आहे. या उडालेल्या फटाक्यातील उरलेली दारू एकत्रित करून पेटविल्याने आगीचा भडका उडला. या भडक्यातच चार… Continue reading कोल्हापुरात फटाक्याचा भडका : चार जखमी

कंटेनरचा ताबा सुटल्याने तवंदी घाटात भीषण अपघात

कोल्हापूर: रस्ते काम आणि पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनाचा स्पीड आणि खराब व अरुंद रस्त्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळते. तवंदी घाटात काल कंटेनरचा ताबा सुटल्याने मोठा अपघात झाल्याची घटना घडली. कोल्हापूरातील निपाणीजवळ मोठा भीषण अपघात झाला. काल सायंकाळी तवंदी घाटात अपघाताची घटना घडली. कंटेनर, चारचाकी आणि दुचाकीची जोरात धडक… Continue reading कंटेनरचा ताबा सुटल्याने तवंदी घाटात भीषण अपघात

होंडा कारची रिक्षेला जोराची धडक, रिक्षा चालकाचा मृत्यू

कोल्हापूर – गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री येथील सदाशिव बाबू फेगडे (वय 42) यांचा शुक्रवार ( दि.13) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघात झाला होता. हा अपघात औरनाळ फाटा येथे झाला. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यांचा उपचारापूर्वी साडे नऊच्या सुमारास मृत्यु झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली… Continue reading होंडा कारची रिक्षेला जोराची धडक, रिक्षा चालकाचा मृत्यू

आयशर टेम्पोने दिली मोटारसायकला धडक, मोटारसायकल स्वारचा मृत्यू

कोल्हापूर – गगनबावडा तालुक्यातील गोरिवडे येथे राहत असलेले सचिन रामचंद्र वडाम (वय 29) यांचा बुधवार (दि.11) रोजी दुपारी पावणे पाचच्या सुमारास अपघात झाला. हा अपघात बावेली नदीच्या कॉर्नर परिसरात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी प्रथम गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात… Continue reading आयशर टेम्पोने दिली मोटारसायकला धडक, मोटारसायकल स्वारचा मृत्यू

खेडगे धबधब्यात पडून वेंगरूळच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

कडगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील खेडगे येथील धबधब्यात पडून वेंगरुळच्या सुरज मेणे (वय २३) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला‌. काल मंगळवारी सुरज आपल्या अन्य दोन साथीदारासह खेडगे येथील धबधबा पाहण्यासाठी गेला होता. सुरज हा दुपारी दोनच्या सुमारास येथील मंडपी कडा या धबधब्यावर शेवाळ असलेल्या दगडावरून पाय घसरून पाण्यात पडला. सुरजला पोहायला येत नसल्याने तो पाण्यात… Continue reading खेडगे धबधब्यात पडून वेंगरूळच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

सरवडे अपघात: ट्रक-बोलेरो धडकेत तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

  राधानगरी – राधानगरी तालुक्यातील सरवडे व मांगेवाडी हद्दीतील सूर्यवंशी चव्हाण मळ्याजवळ ट्रक आणि बोलेरो गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला असून, चारजण गंभीर जखमी झाले आहे राधानगरी पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, दि. 11 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 12:30 वाजता सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ पश्चिम वळणावर ट्रक (क्रमांक KA28AA8206) आणि बोलेरो (क्रमांक MH42H3064) यांच्यात… Continue reading सरवडे अपघात: ट्रक-बोलेरो धडकेत तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

हेरवाड येथे मोटारीचा शॉक लावून युवकाचा मृत्यू

कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) : मोटारीचा शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे घडली आहे . किरण चंद्रकांत नेर्ले ( वय : 25 ) असे त्या मृत तरूणाचे नाव आहे . याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की , इलेक्ट्रिक मोटर सुरू करीत असताना किरण याला विजेचा जोरदार धक्का बसला व… Continue reading हेरवाड येथे मोटारीचा शॉक लावून युवकाचा मृत्यू

येवती येथील शाळकरी मुलीचा अपघाती मृत्यू

दिंडनेर्ली ( प्रतिनिधि ) – येवती तालुका करवीर येथे आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास दिगंबर आळवेकर यांच्या दुकानात जवळ स्कूल बस च्या धडकेत बसमधून घरी पायी चालत जात असलेल्या पाच वर्षे चिमुकली अलिना फिरोज मुल्लानी ही गंभीर जखमी झाली व तिला सीपीआर मध्ये दाखल केले असताना मृत घोषित करण्यात आले. याबाबतची माहिती अशी की येवती… Continue reading येवती येथील शाळकरी मुलीचा अपघाती मृत्यू

कोकणातील एसटीचा ‘या’ ठिकाणी भीषण अपघात..

सिंधुदुर्ग( प्रतिनिधी ) : विजापूर ते कुडाळ दरम्यान प्रवास करणाऱ्या एसटीचा भीषण अपघात झाला आहे. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादामध्ये ही एसटी ओहोळात पलटी झाली आहे .सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसटीचा अपघात हा वैभववाडी तालुक्यातील कसूर या गावामध्ये भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. या बसमध्ये… Continue reading कोकणातील एसटीचा ‘या’ ठिकाणी भीषण अपघात..

error: Content is protected !!