गोकुळ, जिल्हा बँकेसह इतर संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा स्थगिती…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय आज (बुधवार) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सहकार खात्याने आज सायंकाळी त्याबाबतचा आदेश काढला. या आदेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघ, जिल्हा बॅंक आणि राजाराम, दत्त (आसुर्ले-पोर्ले), शरद या साखर कारखान्यांंसह सुमारे एक हजार संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबणार आहे. मागील मार्चपासून आतापर्यंत… Continue reading गोकुळ, जिल्हा बँकेसह इतर संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा स्थगिती…

नेत्याच्या ‘उपोषण सांगते’साठी दसरा चौकात एकवटला ‘कागल’चा घाटगे गट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक दसरा चौकात उपोषणाला बसलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या समर्थनार्थ आज (बुधवार) सायंकाळी दसरा चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांबरोबरच कागल तालुक्यातील संपूर्ण घाटगे गट सायंकाळी उपोषणाची सांगता करण्यासाठी दसरा चौकात एकवटला होता. उपोषणस्थळी आ. प्रकाश आवाडे, माजी आमदार संपतबापू पाटील, इंदौर गादीचे… Continue reading नेत्याच्या ‘उपोषण सांगते’साठी दसरा चौकात एकवटला ‘कागल’चा घाटगे गट…

इचलकरंजीत राबवली पंचगंगा नदी जलपर्णीमुक्त मोहीम…

इचलकरंजी (प्रतिनिधी) :  इचलकरंजीतील पंचगंगा नदीपात्रला दोन्ही बाजूंनी जलपर्णीने विळखा घातला आहे. पैलवान अमृत भोसले यांनी ही नदी जलपर्णीमुक्त करण्यासाठी मोहीम राबविण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी व्यंकोबा मैदानातील सर्व छोट्या-मोठ्या पैलवानांना सोबत घेऊन आज (बुधवार) या मोहिमेला प्रारंभ केला. पैलवान अमृत भोसले यांनी यापूर्वीही त्यांच्या पैलवानांसह जलपर्णी काढण्यासाठी अनेकदा मोहीम हाती घेतली होती. तसेच पंचगंगा… Continue reading इचलकरंजीत राबवली पंचगंगा नदी जलपर्णीमुक्त मोहीम…

वीज कनेक्शन टेंडर मंजुरीनंतरही आळते पाणी योजना प्रलंबितच…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील आळते या गावामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी योजना राबवली जात आहे. नदीवरील मोटारीला वीज कनेक्शन जोडण्यासाठी २०१९ मध्ये वीज कनेक्शनचे टेंडर मंजूर झाल्याचे समजते. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे वीज कनेक्शनचा खर्च वाढल्याने काम झालेले नाही. परिणामी, गावाची पाणी योजना प्रलंबितच राहिली आहे. वास्तविक वीज कनेक्शनचा नवीन… Continue reading वीज कनेक्शन टेंडर मंजुरीनंतरही आळते पाणी योजना प्रलंबितच…

घरगुती वीजबिलाबाबत तरतूद करण्याचा शासनाचा विचार : खा. धैर्यशील माने

शिरोळ (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. परंतु  नागरिकांनीही आपली जबाबदारी समजून सतर्क राहिले पाहिजे. व काळजी घेतली पाहिजे. घरगुती वीजबिलात तरतूद करण्याचा शासनाचा विचार सुरू आहे. तसेच नियमित वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होणार नाही, या चीही दखल घेतली जाईल, असे शिवसेना प्रवक्ते  व खासदार धैर्यशील माने यांनी… Continue reading घरगुती वीजबिलाबाबत तरतूद करण्याचा शासनाचा विचार : खा. धैर्यशील माने

दसरा चौकात समरजितसिंह घाटगे यांचे लाक्षणिक उपोषण सुरू   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळातील वाढून आलेल्या वीजबिलासाठी सवलती, शेती पंपाच्या वीज बिलांची माफी,  अनेक शेतकऱ्यांना जाहीर करून न दिलेले ५० हजार रुपयांचे अनुदान,  महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा शासन आदेश काढून ही न केलेली अंमलबजावणी या मागण्यांबाबत आणि  राज्य सरकारच्या फसव्या धोरणांविरोधात   भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज (बुधवार) लाक्षणिक उपोषणाला सुरूवात केली. दसरा चौकातील छ.… Continue reading दसरा चौकात समरजितसिंह घाटगे यांचे लाक्षणिक उपोषण सुरू   

शिंगणापूर शाळेतील मॅॅट प्रकरणाला वेगळेच वळण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवरून चालू असलेली कायदेशीर लढाई मिटली, पण शिंगणापूरच्या शाळेतील कुस्ती मॅट प्रकरणाला एक वेगळेच वळण लागल्याची चर्चा आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवरून चालू असलेल्या कायदेशीर लढाईला आता थंडे स्वरूप आलेले दिसते. एकमेकांच्या भांडणात निधी परत जायला नको म्हणून अध्यक्ष… Continue reading शिंगणापूर शाळेतील मॅॅट प्रकरणाला वेगळेच वळण…

कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून कारवाईचा बडगा : दिवसात ३५ हजारांवर दंड वसूल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिसांनी बेशिस्त वागणाऱ्यांवर कारवाईस सुरुवात केली आहे. आज १० दुकानांसह १८१ नागरिकांकडून ३५, १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोव्हज  वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबद्दल ही… Continue reading कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून कारवाईचा बडगा : दिवसात ३५ हजारांवर दंड वसूल

राज्यात कमी खर्चातील, आपत्तीरोधक घरकुलांची होणार निर्मिती : ना. हसन मुश्रीफ

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल योजनांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आयआयटी (मुंबई), रिलायन्स फाऊंडेशन आणि हुडको यांच्यामध्ये भागीदारी करण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (मंगळवार) केली. राज्यात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार घरकुल डिझाईन करणे, कमी खर्चातील पण दर्जेदार घरकुलाचे तंत्रज्ञान विकसित करणे तसेच भूकंप, वादळ आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करु… Continue reading राज्यात कमी खर्चातील, आपत्तीरोधक घरकुलांची होणार निर्मिती : ना. हसन मुश्रीफ

प्रशासनाने दत्तवाड-दानवाड परिसरातील कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा : खा. धैर्यशील माने

शिरोळ (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून शिरोळ तालुक्यातील दत्तवाड-दानवाड परिसरात कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. कुत्र्यांनी नागरिकांसह पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवून त्यांचे प्राण घेतले आहेत. या कुत्र्यांचा प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा, नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी, शेतामध्ये एकटेदुकटे जाऊ नये, प्रतिकारासाठी जवळ शस्त्रे बाळगावीत, अशा सूचना खा. धैर्यशील माने यांनी केल्या. खा. माने आणि शिरोळ तालुकाप्रमुख वैभव उगळे… Continue reading प्रशासनाने दत्तवाड-दानवाड परिसरातील कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा : खा. धैर्यशील माने

error: Content is protected !!