कासारवाडी येथे रब्बी ज्वारी पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

टोप (प्रतिनिधी) : कासारवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत शेती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे उद्देशाने रब्बी ज्वारी पीक उत्पादन आणि तंत्रज्ञान या विषयावर कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. विभागीय विस्तार केंद्राचे डॉ. अशोक पिसाळ यांनी ज्वारी पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन व बदलत्या हवामानानुसार ज्वारीचे नियोजन… Continue reading कासारवाडी येथे रब्बी ज्वारी पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

पिशवी येथील वनराईतील आगीची चौकशी करा..!

बांबवडे (प्रतिनिधी) : पिशवी (ता.शाहूवाडी) येथील देवमाळ परिसरातील वनराईमध्ये अज्ञाताने लावलेल्या आगीत दुर्मीळ वृक्ष, वनस्पती, नैसर्गिक संसाधनांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या आगीची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी झाड फौंडेशनच्या सदस्या प्रियांका इंगवले यांनी शाहूवाडीचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिशवी येथील देवमाळ परिसरातील गायरान जमीन गट… Continue reading पिशवी येथील वनराईतील आगीची चौकशी करा..!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा महोत्सव लांबणीवर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पन्हाळा  महोत्सव लांबणीवर टाकण्यात आला आहे.  नगरपालिकेच्या वतीने २६,२७ आणि २८  फेब्रुवारीरोजी महोत्सव आयोजित करण्यात येणार होता. परंतु हा महोत्सव तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली आहे. या महोत्सवात सांस्कृतिक,  खादय महोत्सव,  ऐतिहासिक… Continue reading कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा महोत्सव लांबणीवर

लॉकडाउनसंदर्भात मेसेज फॉरवर्ड करण्याआधी ‘ही’ बातमी वाचा..!

मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाउनसंदर्भात सोशल मीडियावर आलेला मेसेज फॉरवर्ड केल्यास आता कारवाई  होणार आहे.  सोशल मीडियातून लॉकडाउन होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे सायबर सेलला लॉकडाउनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे  लॉकडाउन लागू… Continue reading लॉकडाउनसंदर्भात मेसेज फॉरवर्ड करण्याआधी ‘ही’ बातमी वाचा..!

असळज वन विभागाचा स्तुत्य उपक्रम…

बोरपाडळे (प्रतिनिधी) : असळजपासून तीन ते चार किमी. अंतरावर असणाऱ्या जंगलातील नष्ट झालेला जांभळीचा पाणवठा असळज वन विभागाने वन्य प्राण्यांसाठी श्रमदानातून पुन्हा जिवंत केला आहे. हा पाणवठा गेली कित्येक वर्षे बंदावस्थेत होता. असळजपासून तीन ते चार किमी. अंतरावर घनदाट जंगलातील जांभळीचा पाणवठा गेले कित्येक वर्षे बंदावस्थेत होता. परिणामी जंगलातील प्राण्यांना बारा महिने पाण्यासाठी भटकंती करावी… Continue reading असळज वन विभागाचा स्तुत्य उपक्रम…

‘त्या’साठी वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यावर दबाव टाकल्याची ‘क्लिप’ व्हायरल : ‘चंदगड’मध्ये  खळबळ

चंदगड (प्रतिनिधी) : एका सामाजिक कार्यकर्त्याला न केलेल्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी चंदगड पंचायत समितीमधील एक वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यावर खोटा जबाब देण्यासाठी दबाव टाकत असल्याचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यामुळे चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे. मागील काही महिन्यापूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याने ग्रामपंचायतमधील सदस्यांनी खोटे जबाब दिल्याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून पंचायत समितीच्या दारात सुमारे दीड महिने आंदोलन केले होते.… Continue reading ‘त्या’साठी वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यावर दबाव टाकल्याची ‘क्लिप’ व्हायरल : ‘चंदगड’मध्ये  खळबळ

‘आंदोलन अंकुश’च्या शिरोळ तालुका बंदला संमिश्र प्रतिसाद

शिरोळ (प्रतिनिधी) : महावितरणने अन्यायकारकपणे वीजबिल वसुली सुरूच ठेवल्याच्या निषेधार्थ आज (सोमवार) ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने शिरोळ तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. एरवी गजबजलेल्या बाजारपेठेसह गावांमध्ये सर्व व्यवहार बंद असल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शिरोळमध्ये काही वेळ दुकाने बंद ठेवण्यात आली होती. नंतर मात्र ती उघडण्यात आली.… Continue reading ‘आंदोलन अंकुश’च्या शिरोळ तालुका बंदला संमिश्र प्रतिसाद

दिंडेवाडी येथील संजय गुरव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

पिंपळगाव (प्रतिनिधी) :  दिंडेवाडी (ता.भुदरगड ) येथील प्राथमिक शिक्षक संजय यशवंत गुरव यांना आनंदगंगा फौंडेशनच्या वतीने (मिणचे ता.हातकणंगले)  जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. अतिग्रे येथील  संजय घोडावत विद्यापीठात पार पडलेल्या वितरण सोहळ्यात माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात राबवलेले विविध उपक्रम,  मोठ्या प्रमाणात केलेला शैक्षणिक उठाव,… Continue reading दिंडेवाडी येथील संजय गुरव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

कर्नाटकात प्रवेश बंदी

कोल्हापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र, केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्ण वाढत असल्याने कर्नाटक शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानुसार कर्नाटक शासनाच्या पोलिस प्रशासनाने महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथून प्रमाणपत्र नसणाऱ्या… Continue reading कर्नाटकात प्रवेश बंदी

संस्कारित मुले हीच आपली धनदौलत :  प्रा. पवन पाटील

राशिवडे (प्रतिनिधी) : संस्कारित मुले हीच आपली धनदौलत आणि राष्ट्राची संपत्ती आहे. याची जाण ठेऊन आईवडिलांनी आपल्या पाल्यावर संस्कार करावेत, असे प्रतिपादन प्रा. पवन पाटील यांनी केले. राशिवडे बु. येथील शिवबा प्रतिष्ठान आयोजित शिवमहोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे वीर शिवा काशिद यांचे थेट वंशज आनंदा काशीद होते. ३ दिवसीय महोत्सवात शिवप्रेरणा… Continue reading संस्कारित मुले हीच आपली धनदौलत :  प्रा. पवन पाटील

error: Content is protected !!