कुरुंदवाडच्या विकासकामांसाठी ४ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर : दिपक गायकवाड

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेला शासनाच्या विविध विकास योजनेतून ४ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मूलभूत सेवासुविधा, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमनच्या मोटारसायकल आदींचा समावेश आहे. अशी माहिती प्रभारी नगराध्यक्ष दिपक गायकवाड यांनी दिली. दिपक गायकवाड म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधार योजनेतून २ कोटी २५ लाख रुपये, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील १ कोटी… Continue reading कुरुंदवाडच्या विकासकामांसाठी ४ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर : दिपक गायकवाड

अथणी शुगर्सने अंतुर्ली ग्रामपंचायतीचा थकीत कर भरला…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील तांबाळे येथील अथणी शुगर्सकडून अंतुर्ली ग्रामपंचायतीचा सन २०१६-१७ पासुन थकीत असलेला  कर भरण्यात आला. या थकीत करासाठी अंतुर्ली ग्रामस्थांनी साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखली होती. पण भुदरगडच्या तहसीलदारांनी यात यशस्वी शिष्टाई केल्यानंतर कारखान्याने ग्रामपंचायत कर भरला. त्यामुळे ग्रामस्थांनी कारखाना व भुदरगड प्रशासनाचे आभार मानले आहेत. थकीत ग्रामपंचायत करासाठी अंतुर्ली ग्रामस्थांच्या… Continue reading अथणी शुगर्सने अंतुर्ली ग्रामपंचायतीचा थकीत कर भरला…

‘लाईव्ह मराठी’ इम्पॅक्ट : अखेर तो धोकादायक पोल बदलला      

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोडपैकी कुरणेवाडी येथे आठ दिवसापूर्वी रात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्यालगत असलेला विद्युत वाहक पोल मोडला होता.‌ तरीही या पोलवरून कुरणेवाडी आणि तेली वसाहत येथे विद्युत पुरवठा सुरू होता. यासंदर्भात ‘लाईव्ह मराठी’ने २० डिसेंबर रोजी हा संबंधित पोल बदलण्या संदर्भात वृत्त प्रसारीत केले होते. या वृत्ताची दखल घेत महावितरण कंपनीने… Continue reading ‘लाईव्ह मराठी’ इम्पॅक्ट : अखेर तो धोकादायक पोल बदलला      

कैलासगडची स्वारी मंदिराच्या उपाध्यक्षपदी सत्यजित जाधव यांची निवड…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मंगळवार पेठेतील प्रसिद्ध असणाऱ्या कैलासगडची स्वारी मंदिर विश्वस्त समितीच्या उपाध्यक्षपदी दिवंगत आ. चंद्रकांत जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. आ. चंद्रकांत जाधव हे मंदिर विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजीत करण्यात आली होती. या निवडीच्या अध्यक्षस्थानी मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव होते.… Continue reading कैलासगडची स्वारी मंदिराच्या उपाध्यक्षपदी सत्यजित जाधव यांची निवड…

अथणी शुगर्सची ऊस वाहतुक अंतुर्ली ग्रामस्थांनी पाडली बंद…

गारगोटी (प्रतिनिधी) : अथणी शुगर्सने अंतुर्ली ग्रामपंचायतीची २०१६ पासुनची तब्बल १ कोटी ६ लाख ४४ हजार रूपयांची कराची रक्कम थकवली आहे. याबाबत अंतुर्ली ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी अथणी शुगर्सला कराची रक्कम भरण्याच्या लेखी सुचना देऊनही त्यांनी दाद दिली नाही. ही रक्कम न दिल्याने आज (मंगळवार) अथणी शुगर्स युनीटकडे जाणारी सर्व ऊसाची वाहतूक ग्रामस्थांनी रोखून धरली. यावेळी… Continue reading अथणी शुगर्सची ऊस वाहतुक अंतुर्ली ग्रामस्थांनी पाडली बंद…

तेरवाड ग्रामपंचायतीवर गंगापूर येथील महिलांचा मोर्चा…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील गंगापूरमध्ये  सय्यद ट्रंक मार्टच्या ध्वनी प्रदूषणामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे. याची तक्रार ग्रामपंचायतीकडे करूनही ग्रामसेवक दुर्लक्ष करीत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी हा मोर्चा येत असल्याचे पाहून ग्रामसेवक रेळेकर यांनी मिटिंगचे कारण सांगून… Continue reading तेरवाड ग्रामपंचायतीवर गंगापूर येथील महिलांचा मोर्चा…

आजरा येथे आईची दशक्रिया विधी सुरू असतानाच मुलाचा मृत्यू  

आजरा (प्रतिनिधी) :  आजरा येथील शिवाजीनगर घाट परिसरात  आईची दशक्रिया विधी करण्यासाठी आलेल्या  पुत्राचा हृदयविकाराचा  तीव्र झटका  आल्याने आज (मंगळवार) सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. मारुती आनंदा मुडे (वय ५५,  रा. पाळ्याचा हुडा, ता. भुदरगड) असे मृत्यू झालेल्या अभागी मुलाचे नांव आहे. आईचा दशक्रिया विधी सुरू असतानाच मुलाचा असा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात… Continue reading आजरा येथे आईची दशक्रिया विधी सुरू असतानाच मुलाचा मृत्यू  

दौलतनगर येथे प्रॉपर्टी कार्डसाठी विशेष शिबिर

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या  वतीने दौलतनगर येथे झोपडपट्टी वासियांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी प्रॉपर्टी कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात आली.  दौलतनगर, शाहूनगर परिसरात अनेक वर्षपासून वास्तव्य करत असलेल्या झोपडपट्टीधारकांकडे प्रॉपर्टी कार्ड नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  … Continue reading दौलतनगर येथे प्रॉपर्टी कार्डसाठी विशेष शिबिर

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गडकिल्ल्यांवरील गैरप्रकार रोखावेत : हिंदु जनजागृती समिती

रांगोळी (प्रतिनिधी) : नाताळ ते ३१ डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात पार्ट्या केल्या जातात. यामध्ये ऐतिहासिक स्थळांवर मद्यपान करणे, फटाके फोडणे, धुम्रपान करणे आदी प्रकार केले जातात. त्यामुळे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ल्यांवर आदी सार्वजनिक ठिकाणांवर अशा पार्ट्या करण्यावर प्रतिबंध आणावा. तिथे पोलिसांची गस्तीपथके नेमून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी नगरपरिषदेत… Continue reading नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गडकिल्ल्यांवरील गैरप्रकार रोखावेत : हिंदु जनजागृती समिती

कळे बाजारपेठेतील दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा बंदोबस्त करावा : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील बाजारपेठेत साठणाऱ्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा विभाग प्रमुख रामचंद्र नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूरला निवेदन दिले. हे निवेदन कार्यकारी अभियंता संजय काटकर यांनी स्विकारले. निवेदनात म्हटले आहे की, कळेतील बाजारभोगाव मुख्य रस्त्यावरील सांडपाणी व खराब रस्त्यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका आहे दुर्गंधीयुक्त परिसरामुळे कळे बाजारपेठेत कोरोनाचा… Continue reading कळे बाजारपेठेतील दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा बंदोबस्त करावा : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

error: Content is protected !!