संजय भोसलेंना बेड्या ठोकल्याशिवाय शांत बसणार नाही : भूपाल शेटे (व्हिडिओ)

महापालिकेचे कर निर्धारक संजय भोसले यांच्या कारकिर्दीत घरफाळा वसुलीमध्ये मोठी तफावत आढळून आली असून असे त्यांना बेड्या ठोकल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा नगरसेवक भूपाल शेटे यांनी दिला.  

भाजपचा माजी खासदार पत्नीसह बेपत्ता   

पुणे (प्रतिनिधी) : वादग्रस्त विधाने करून नेहमी चर्चेत राहणारे भाजपचे माजी खासदार संजय काकडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मेव्हण्याला  गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात येणार आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्यांच्या घरी आणि कार्यालयात त्यांना अटक करण्यासाठी गेले होते. परंतु ते त्या ठिकाणी सापडले नाहीत. संजय काकडे यांनी स्वतःच्या मेव्हण्याला… Continue reading भाजपचा माजी खासदार पत्नीसह बेपत्ता   

अर्णब गोस्वामीच्या अटकेवर संजय राऊत म्हणतात…

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात कायद्यानुसार सर्व कामे केली जातात. त्यामुळे आमच्याकडून काही चुकले असेल, तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावरही अन्याय करत नाहीत, असे स्पष्ट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत पुढे म्हणाले की, जर कोणी गुन्हा केला असेल… Continue reading अर्णब गोस्वामीच्या अटकेवर संजय राऊत म्हणतात…

अजून किती गळे दाबणार आहात? कंगणाचा ठाकरे सरकारवर पुन्हा हल्लाबोल   

मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर विरोधकांकडून सरकारविरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. यात आता अभिनेत्री कंगना राणावत हिनेही उडी घेतली आहे. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात?  किती तोंडं बंद करणार आहात? असा सवाल करत कंगनाने ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. मला महाराष्ट्र… Continue reading अजून किती गळे दाबणार आहात? कंगणाचा ठाकरे सरकारवर पुन्हा हल्लाबोल   

जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाचा मार्ग मोकळा : विरोधकांना धक्का (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्वनिधी आणि १५ व्या वित्त आयोगाकडून उपलव्ध झालेल्या निधीबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चालू असलेल्या घमासान लढाईस पूर्णविराम मिळाला आहे. सर्वसाधारण सभेच्या निर्णयाप्रमाणे १५ व्या वित्त आयोगातील निधी विकासकामांवर खर्ची टाकण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. अशी माहिती जि. प. चे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी आज (मंगळवार) दिली.      जिल्हा… Continue reading जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाचा मार्ग मोकळा : विरोधकांना धक्का (व्हिडिओ)

…अन्यथा शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावं लागेल : समरजितसिंह घाटगे (व्हिडिओ)

सरकारने शेतकऱ्यांचे विविध प्रश्न त्वरित मार्गी लावावे अन्यथा त्यांच्या आक्रोशाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.  

कोल्हापुरातून निवडून येणार होता, तर त्यांचा अधिकार का डावलला ?

नाशिक (प्रतिनिधी) : कोल्हापूरमधून निवडून येणार होतात, तर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा अधिकार का डावलला? असा खोचक प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचलं. कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे चॅलेंज चंद्रकांत पाटलांनी दिले… Continue reading कोल्हापुरातून निवडून येणार होता, तर त्यांचा अधिकार का डावलला ?

स्वतःसाठी एक नोकरी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, कारण…; भाजप नेत्याची टीका

मुंबई (प्रतिनिधी) : स्वतःसाठी एक नोकरी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, कारण स्वतः बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात. स्वतः काहीतरी करतील तरच नोकरी व व्यवसायाची किंमत कळेल, अशा शब्दांत भाजपचे आमदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.    गेल्या सात महिन्यांपासून कोरोनामुळे संपूर्ण उद्योग- व्यवहार बंद होते. आता त्यांना गती मिळू लागली आहे. देशविदेशातील १५… Continue reading स्वतःसाठी एक नोकरी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, कारण…; भाजप नेत्याची टीका

चंद्रकांतदादांना हिमालयामध्ये जावे लागणार नाही :  हसन मुश्रीफ  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंद्रकांतदादा पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. चंद्रकांतदादांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषदे च्या बारा जागासंदर्भातील माझ्या वक्तव्याला पुष्टीच दिली आहे,  असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे  की, … Continue reading चंद्रकांतदादांना हिमालयामध्ये जावे लागणार नाही :  हसन मुश्रीफ  

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

मुंबई (प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या जागांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळेल. औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघ अशा पाच जागांसाठी ही… Continue reading पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

error: Content is protected !!