संजय भोसलेला स्मशानभूमी दाखवा ! : भूपाल शेटे (व्हिडिओ)

घरफाळा घोटाळाप्रकरणी संजय भोसलेंची बदली करण्यात आल्यानंतर नगरसेवक भूपाल शेटे यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.  

पुणे मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे जयंत आसगावकर, अरुण लाड यांचे अर्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर तर पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अरुण लाड यांनी आज (गुरुवार) महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय मोरे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कोल्हापूरचे… Continue reading पुणे मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे जयंत आसगावकर, अरुण लाड यांचे अर्ज

चंदगड-गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघाला शिवाजीराव पाटील यांची भेट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजप राज्य कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य तथा भाजपा माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील हे चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी गडहिंग्लज तालुक्यांतील सांबरे, भडगांव, किल्ले सामानगड, येणेचवंडी, हलकर्णी, नूल, जरळी, मुत्नाळ, निलजी या विविध ठिकाणी भेटी देऊन पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडी-अडचणी समजुन घेतल्या. यामुळे कार्यकर्त्यामध्ये नवसंजीवनी… Continue reading चंदगड-गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघाला शिवाजीराव पाटील यांची भेट…

‘यामुळेच’ सरकार पडणार असल्याचे फडणवीस सारखं सांगतात : जयंत पाटील

औरंगाबाद (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज (गुरूवार) येथे टोला लगावला आहे. भाजपच्या आमदारांनी पक्ष सोडू नये, म्हणून  देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे सरकार पडणार, असे वारंवार सांगत राहावे लागत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे… Continue reading ‘यामुळेच’ सरकार पडणार असल्याचे फडणवीस सारखं सांगतात : जयंत पाटील

सांगलीकरांसाठी ‘दोन’ पाटलांची प्रतिष्ठा पणाला..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मदरासंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून कडेपूरचे संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून कुंडलचे अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर केली. दोन्ही उमेदवार सांगली जिल्ह्यातीलच आहेत.  देशमुख यांच्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि लाड यांच्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागेल. पदवीधरसाठी अनेकजण इच्छुक होते. पण उमेदवारांच्या निश्चितीमध्ये भाजप… Continue reading सांगलीकरांसाठी ‘दोन’ पाटलांची प्रतिष्ठा पणाला..!

महाराष्ट्र कुठं नेला..? : ‘शवसेना’ म्हणत अमृता फडणवीसांची टीका

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या मित्रपक्षांना ठार केलं, असा टोला  माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी  लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेनेचा ‘शवसेना’ असाही उल्लेख केला आहे. शिवसेनेने आपल्या साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले, अशी टीका अमृता यांनी ट्विटवरुन केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी,  महाराष्ट्र कुठे नेला असो, पण बिहार… Continue reading महाराष्ट्र कुठं नेला..? : ‘शवसेना’ म्हणत अमृता फडणवीसांची टीका

सदाभाऊ खोतांचा सवतासुभा

पुणे (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. महायुतीतील घटकपक्ष असणाऱ्या रयत क्रांती संघटनेकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपच्या कोटयातून विधानपरिषदेवर आमदार झालेले सदाभाऊ खोत यांनी सवतासुभा मांडला आहे. परिणामी भाजपसोबत असलेले घटकपक्षही नाराज असलेल्याचे समोर येत आहे. कोल्हापूरचे प्राध्यापक एन डी चौगुले यांना रयत क्रांती संघटनेकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी… Continue reading सदाभाऊ खोतांचा सवतासुभा

पदवीधरसाठी दोन सांगलीकरांमध्येच लढत : राष्ट्रवादीकडून अरूण लाड

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरूण लाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. तर औरंगाबाद विभागातून सतिश चव्हाण यांना तिकीट देण्यात आले आहे. पुणे पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने सांगलीतील संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर लाड हे सांगलीतील कुंडल गावाचे आहेत. त्यामुळे… Continue reading पदवीधरसाठी दोन सांगलीकरांमध्येच लढत : राष्ट्रवादीकडून अरूण लाड

तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अर्णब गोस्वामींचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकार आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यातील संघर्ष चिघळणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण अर्णब यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अर्णब यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.     अर्णब यांनी आपल्या ट्विट म्हटले आहे की, उद्धव… Continue reading तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अर्णब गोस्वामींचा उद्धव ठाकरेंना इशारा

‘याबाबत’ नितीशकुमारांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा..!

मुंबई (प्रतिनिधी) : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली  एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत चौथ्यांदा सत्तेची सुत्रे हातात ठेवली आहेत. आता पुन्हा नितीशकुमार मुख्यमंत्री होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना सत्ता स्थापन करताना नितीशकुमार यांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा… Continue reading ‘याबाबत’ नितीशकुमारांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा..!

error: Content is protected !!