कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर तर पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अरुण लाड यांनी आज (गुरुवार) महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला.

या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय मोरे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी खासदार वंदना चव्हाण, मोहन दोशी, पुण्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व आ. चेतन पाटील, अंकुश काकडे, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे अनेक नगरसेवक उपस्थित होते.