महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समितीच्या समन्वयकपदी रजनीकांत खांडेकर

सावरवाडी (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समितीअंतर्गत राज्यस्तरीय समन्वयकपदी करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील रजनीकांत शशिकांत खांडेकर यांची निवड करण्यात आली. विधानसभा मंत्रालयात झालेल्या एका कार्यक्रमात माजी मंत्री रामभाऊ गुंडीले  यांच्याहस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी चंदन भुतार जोगे, राजू पटेल, वर्षा भुताळे मनोज गोइल आदी मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर महापालिकेतर्फे छ. ताराराणी यांना आदरांजली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात महापालिकेच्या वतीने छत्रपती ताराराणी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज (सोमवार) कावळा नाका येथील छ. ताराराणी यांच्या पुतळयास प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, कनिष्ठ अभियंता चेतन आरमाळ, संजय भोसले यांच्या सह कर्मचारी उपस्थित… Continue reading कोल्हापूर महापालिकेतर्फे छ. ताराराणी यांना आदरांजली

‘लॉकडाउन’मध्ये भोई गल्लीतील विद्यार्थ्यांनी राबवले अनोखे उपक्रम… (व्हिडिओ)

लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्या. मात्र, या कालावधीत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून कोल्हापूरच्या रविवार पेठेतील भोई गल्लीमधील विद्यार्थ्यांनी अनुकरणीय उपक्रम राबवले. लाईव्ह मराठीचा खास रिपोर्ट…  

महापालिकेच्यावतीने महात्मा जोतिबा फुले यांना आदरांजली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज (शनिवार) महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रंगराव चौगले, राजन मेस्त्री, अरुन जमादार, व कर्मचारी उपस्थित होते.

चित्रपट महामंडळाचे ऑफिस कोल्हापुरातून हलविण्याचा वर्षा उसगावकरांचा विचार : मेघराज राजेभोसले (व्हिडिओ)

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कोल्हापुरातील ऑफिस इतरत्र हलविण्याचा वर्षा उसगावकरांचा विचार आहे, असा आरोप माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केला.  

‘या’मागचे खरे सूत्रधार सुशांत शेलारच : मेघराज राजेभोसले (व्हिडिओ)

माझ्यावर बेकायदेशीररित्या अविश्वासाचा ठराव मंजूर केला त्याला मी कोर्टात आव्हान देणार आहे. या कारस्थानाचे खरे सूत्रधार सुशांत शेलारच आहेत असा आरोप अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केला.  

मेघराज राजेभोसलेंवर आम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवला : धनाजी यमकर (व्हिडिओ)

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर आम्ही आंधळेपणाने ठेवलेला विश्वास ही चूक झाल्याचे प्रभारी अध्यक्ष धनाजी यमकर यांनी सांगितले.  

त्यामुळेच मेघराज राजेभोसलेंविरुद्ध अविश्वास ठराव : सुशांत शेलार (व्हिडिओ)

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर ‘त्यामुळेच’ कार्यकारिणी सभेत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याचे अभिनेता सुशांत शेलार यांनी सांगितले.  

श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत वाढ, ई-पासचीही सुविधा : महेश जाधव (व्हिडिओ)

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत वाढ केली असून भक्तांना ई-पासचीही सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.  

…मग उपमुख्यमंत्र्यांनीही वारी करू नये : वारकरी संप्रदाय

पंढरपूर (प्रतिनिधी) : संपूर्ण जगभरात आलेल्या कोरोना संकटामुळे सर्वच सार्वजनिक आणि धार्मिक सणांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यदांच्या वर्षातील सर्व धार्मिक सण, वारी रद्द करण्यात आले आहेत. त्याचमुळे कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास शासनाने मनाई केली आहे. वारकऱ्यांना विरोध करत उपमुख्यमंत्री मात्र कार्तिकीची शासकीय महापूजा कसे करू शकतात? हा दुजाभाव शासनाने करू नये. वारकऱ्यांना वारी… Continue reading …मग उपमुख्यमंत्र्यांनीही वारी करू नये : वारकरी संप्रदाय

error: Content is protected !!