रजिस्ट्रेशन न करता थेट लसीकरण सुविधा : डॉ. फारुख देसाई

राशिवडे (प्रतिनिधी) : कोव्हिड लसीकरणचे रजिस्ट्रेशन करताना येणाऱ्या अडचणींमुळे लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु झाला. त्यासाठी ‘लाईव्ह मराठी’ने रजिस्ट्रेशन ऐवजी सरसकट लसीकरण करा अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने लसीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन गावोगावी लसीकरणाचे कॅम्प सुरू केले आहेत. रजिस्ट्रेशन न करता त्या ठिकाणी… Continue reading रजिस्ट्रेशन न करता थेट लसीकरण सुविधा : डॉ. फारुख देसाई

भू-विकास बँकेच्या थकीत शेतकरी कर्जदारांच्या कर्जमाफीचा निर्णय…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील भू-विकास बॅकेच्या थकीत शेतकरी कर्जदारांची कर्जमाफी करण्याचा निर्णय मंत्रालयीन बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे. शिवसेनेचे आ. प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील या थकित शेतक-यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्द्ल भूविकास बॅक शेतकरी बचाव कृती समितीच्या शेतक-यांनी त्यांचा सत्कार करून आभार मानले. तसेच या थकीत कर्जदार शेतक-यांच्या प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडल्याबद्दल ‘लाईव्ह मराठी’चेही… Continue reading भू-विकास बँकेच्या थकीत शेतकरी कर्जदारांच्या कर्जमाफीचा निर्णय…

गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीकडून किरीट सोमय्या यांचा तिरडी मोर्चा…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा तसेच साखर कारखान्यामध्ये गैर कारभार झाल्याचा आरोप केला आहे. त्याच्या निषेधार्थ आज (सोमवार) सायंकाळी गडहिंग्लज येथील दसरा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांचा तिरडी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी गडहिंग्लज राष्ट्रवादीचे शहरप्रमुख सिद्धार्थ बन्ने म्हणाले… Continue reading गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीकडून किरीट सोमय्या यांचा तिरडी मोर्चा…

सानेगुरुजी परिसरात गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करणाऱ्या अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील रावजी मंगल कार्यालय, सानेगुरुजी येथे आज (सोमवार) बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यास आलेल्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत राऊंड असा एकूण ५० हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अजित सुखदेव कांबळे (वय २४, रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर)… Continue reading सानेगुरुजी परिसरात गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करणाऱ्या अटक…

कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी पदी सुनील सोनटक्के…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी सुनील सोनटक्के रुजू झाले. सहायक संचालक (माहिती) फारुख बागवान यांच्याकडून आज (सोमवार) सुनील सोनटक्के यांनी जिल्हा माहिती अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. सोनटक्के हे उस्मानाबाद जिल्ह्यातील बेंबळी गावचे आहेत. यांनी आजवर जळगाव येथे माहिती अधिकारी म्हणून तर हिंगोली, सोलापूर आणि लातूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहिले… Continue reading कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी पदी सुनील सोनटक्के…

मेघोली धरणफुटीची सखोल चौकशी करा : चंद्रकांत पाटील  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु प्रकल्प १ सप्टेंबरला रात्री फुटला होता. हे धरण कोणत्या कारणाने फुटले याची सखोल चौकशी व्हावी, या धरणावर गेले कित्येक दिवस चौकीदार नव्हता हा चौकीदार कोठे होता, याची देखील चौकशी व्हावी, भविष्यातील पाण्याची उपयुक्तता लक्षात घेऊन पुन्हा नव्याने धरण बांधणीसाठी प्लॅन तयार करून संबंधित विभागाकडे त्वरित मंजुरीसाठी पाठवावा, अशी… Continue reading मेघोली धरणफुटीची सखोल चौकशी करा : चंद्रकांत पाटील  

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात रुग्यांची संख्या पन्नासच्या आत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात २९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात २ मृत्यू झाले असून ११५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १३, आजरा – ०, भुदरगड – ०, चंदगड – ०, गडहिंग्लज – १, गगनबावडा – १, हातकणंगले – ८, कागल – ०,  करवीर… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात रुग्यांची संख्या पन्नासच्या आत

मुश्रीफसाहेब, दाव्यासाठी ‘व्हाईट रक्कम’ लागते, ‘ब्लॅक’ चालत नाही : चंद्रकांतदादा  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझे नांव घेतल्याशिवाय मुश्रीफ यांना झोप लागत नाही. त्यांनी खुशाल तक्रार करावी, मी कशाला घाबरत नाही, असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आज (सोमवार) एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.   मंत्री हसन मुश्रीफ यांच्या परिवाराने सुमारे १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज… Continue reading मुश्रीफसाहेब, दाव्यासाठी ‘व्हाईट रक्कम’ लागते, ‘ब्लॅक’ चालत नाही : चंद्रकांतदादा  

भ्रष्टाचाराच्या आरोपांवर ना. मुश्रीफांचे किरीट सोमय्यांना ‘मोठे’ आव्हान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझ्यावर बिनबुडाचे आरोप होणार, हे मला माहीत होते. किरीट सोमय्या यांनी माझ्यावर १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप केले आहेत. याचा मी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो. सोमय्यांना काहीही माहिती नाही. त्यांनी कागल, कोल्हापुरात येऊन माहिती घ्यावी, असे प्रतिआव्हान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांना आज… Continue reading भ्रष्टाचाराच्या आरोपांवर ना. मुश्रीफांचे किरीट सोमय्यांना ‘मोठे’ आव्हान

मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून १२७ कोटींचा भ्रष्टाचार : किरीट सोमय्या

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती जमा केली आहे. याबाबत माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत केला.… Continue reading मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून १२७ कोटींचा भ्रष्टाचार : किरीट सोमय्या

error: Content is protected !!