कोरोनाचे रूग्ण वाढले : आरोग्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांना सक्त सूचना

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कडक नियम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचाच भाग म्हणून कोरोना रुग्ण आढळल्यास कोरोना रुग्णामागे २० ते ३० जणांची तपासणी करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत. सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा.… Continue reading कोरोनाचे रूग्ण वाढले : आरोग्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांना सक्त सूचना

जिल्ह्यातील आठ जणांना कोरोना

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज ( गुरूवारी) दिवसभरात १० जणांनी कोरोनावर मात केली. गेल्या चोवीस तासात आणखी ८ जणांना कोरोनाची बाधा झाली. आज एकही मृत्यू नाही. तसेच ९५४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये बाधितमध्य कोल्हापूर शहरातील ५, कागल तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील दोघांचा सामावेश आहे. एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,१४०. डिस्चार्ज… Continue reading जिल्ह्यातील आठ जणांना कोरोना

‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतर्कतेचा इशारा दिला असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर राजेश टोपे यांनी ट्वीट करून आपल्या आवाजातील बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची… Continue reading ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह  

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनावर लसीकरण सुरू  असताना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. ४२ दिवसांनंतर महाराष्ट्रात प्रथमच देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा कोरोना  चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी  स्वतः ट्विट करत  माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी… Continue reading जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह  

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोविस तासात १३ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (मंगळवार) दिवसभरात १७ जणांनी केली कोरोनावर मात केली. तर गेल्या चोवीस तासात आणखी १३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच ४८७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ९, भूदरगड तालुक्यातील १, कागल तालुक्यातील २ आणि करवीर तालुक्यातील १ अशा तेरा जणांना कोरोनाची… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : चोविस तासात १३ जणांना कोरोनाची लागण

स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस सर्वांनीच घ्यावी : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. कोरोना प्रतिबंधक लस आपल्या देशात तयार झाली आहे. ही स्वदेशी लस सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. ते आज (मंगळवार) आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचा शुभारंभप्रसंगी बोलत होते. जिल्हाधिकारी देसाई म्हणाले की, आत्मनिर्भर भारत आणि कोरोना लसीकरणासंबंधी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.… Continue reading स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस सर्वांनीच घ्यावी : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात १४ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (सोमवार) दिवसभरात १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील चोवीस तासात ९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १००३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  कोल्हापूर शहरातील ८, शाहूवाडी तालुक्यातील १, अशा ९ जणांना लागण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्ण… Continue reading कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात १४ जणांना डिस्चार्ज

कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत १४ जण पॉझिटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात आज (रविवार) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे ६९५ प्राप्त अहवालापैकी ६७३ अहवाल निगेटिव्ह आले. तर ५ अहवाल पॉझिटिव्ह आले. १७ अहवाल नाकारण्यात आले. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे ३६ प्राप्त अहवालापैकी ३५ अहवाल निगेटिव्ह तर १ अहवाल पॉझिाटिव्ह आला. खासगी रुग्णालये आणि लॅबमधून १०६ प्राप्त अहवालापैकी ९८ निगेटिव्ह तर ८ पॉझीटिव्ह असे… Continue reading कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत १४ जण पॉझिटिव्ह

साताऱ्याच्या संस्थेकडून होणार ‘आयजीएम’मध्ये साफसफाई : आ. प्रकाश आवाडे

इचलकरंजी (प्रतिनिधी) : ‘आयजीएम’ रुग्णालयातील स्वच्छताप्रश्‍नी पुढाकार घेतला असून सातारा येथील रुबे अल केअर या संस्थेच्यावतीने प्रायोगिक तत्वावर मोफतपणे महिनाभर रुग्णालयातील स्वच्छता व साफसफाईसह रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. भविष्यातही रुग्णालयातील साफसफाई नियमित व्हावी यासाठी या संस्थेकडून प्रयत्न राहणार आहेत. मंगळवारपासून प्रत्यक्ष काम सुरु केले जाणार… Continue reading साताऱ्याच्या संस्थेकडून होणार ‘आयजीएम’मध्ये साफसफाई : आ. प्रकाश आवाडे

शिरोळ येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची थकीत वेतनासाठी निदर्शने (व्हिडिओ)

शिरोळ येथील कोविड उपचार केंद्रात काम केलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनप्रश्नी पंचायत समितीमधील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.  

error: Content is protected !!