दहावी, बारावीचे‌ वर्ग २३ नोव्हेंबरपासून : वर्षा गायकवाड

मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा प्रत्यक्ष उघडण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार दहावी आणि बारावीचे‌ वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर येणाऱ्या सोमवारी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची पायरी चढता येईल. गायकवाड म्हणाल्या की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य… Continue reading दहावी, बारावीचे‌ वर्ग २३ नोव्हेंबरपासून : वर्षा गायकवाड

आता काही दिवस ऑनलाईन शिक्षणही बंद…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाइन शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. पण आता राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (बुधवार) दिली. विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पध्दतीने मिळणारी सुट्टी या… Continue reading आता काही दिवस ऑनलाईन शिक्षणही बंद…

दिवाळीनंतर शाळा सुरू..?

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील संपूर्ण कामकाज ठप्प होते. पण अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक उद्योगधंदे हळूहळू सुरु होत आहेत. असे असले तरीही शाळा-कॉलेजेस मात्र अजूनही बंदच आहेत. राज्यातील शाळा दिवाळी नंतरच सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा… Continue reading दिवाळीनंतर शाळा सुरू..?

‘या’ मुद्दयावर विद्यार्थी-पालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट  

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या  दोन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी-पालक समन्वय समितीने आज (सोमवार) कृष्ण कुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.   यावेळी अकरावी प्रवेश प्रक्रियेवर मार्ग कसा काढता येईल,  प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली, तर कॉलेज कधी सुरु होणार?… Continue reading ‘या’ मुद्दयावर विद्यार्थी-पालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट  

आता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने  अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया अद्यापही झालेली नाही. त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इतर इयत्तांच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच या विद्यार्थ्यांचेही ऑनलाईन वर्ग घेण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. अकरावी सायन्स, कॉमर्स, आर्टस् शाखेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग मराठी व इंग्रजी माध्यमातून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना… Continue reading आता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू होणार

गोवा विद्यापीठात छ. शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याची खा. संभाजीराजेंची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरु करावे, रायगड विकास प्राधिकरणाला गोवा सरकारने पोर्तुगीज कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि संदर्भग्रंथ याबाबत सहकार्य करावे, या मागण्यांचे निवेदन खा. छ. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी आज (शनिवार) दिले. मुख्यमंत्री सावंत या दोन्ही मागण्या मान्य करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी दिली.… Continue reading गोवा विद्यापीठात छ. शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याची खा. संभाजीराजेंची मागणी

…येत्या पंधरा दिवसात प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील- डॉ. अशोक उबाळे

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापुरातील विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येणारी वैद्यकीय बिले, पेन्शन योजना, भविष्य निर्वाह निधी आणि विविध प्रश्नासंदर्भात आलेल्या तक्रारीपैकी जवळपास ८० टक्के निर्गतीकरण झाले असून उर्वरित प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लागतील, असे आश्वासन सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ. अशोक उबाळे यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना दिले. कोल्हापुरातील विभागीय सहसंचालक कार्यालयातील भ्रष्टाचारासंदर्भात आमदार प्रकाश आबिटकर यांनी… Continue reading …येत्या पंधरा दिवसात प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील- डॉ. अशोक उबाळे

अभिमानास्पद : कोल्हापूरच्या चिमुकल्या ‘अनुप्रिया’चा आशिया खंडात डंका (व्हिडिओ)

कोल्हापुरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये शिकणाऱ्या अनुप्रिया अमितकुमार गावडे या चिमुकलीनं यशाचं नवं शिखर गाठत कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय. काय आहे तिची कामगिरी, हे जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ…  

शाळा कधी सुरू होणार याबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. तरी राज्यातील शाळा दिवाळी नंतरच सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.  गायकवाड म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्या-टप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी… Continue reading शाळा कधी सुरू होणार याबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…

नोकरीसाठी ‘येथे’ अर्ज करा 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि पन्हाळाकरिता तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने, अशासकीय अधीक्षकाचे प्रत्येकी एक पद भरण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक १० नोव्हेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले यांनी केले आहे. हे अशासकीय पद फक्त सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या… Continue reading नोकरीसाठी ‘येथे’ अर्ज करा 

error: Content is protected !!