शाळा २३ पासून सुरू करणार, पण… : सत्यवान सोनवणे (व्हिडिओ)

जिल्ह्यातील शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्या, तरी काही अटींचे पालन करणे बंधनकारक असल्याचे शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी ‘लाईव्ह मराठी’कडे स्पष्ट केले.  

‘असा’ साजरा झाला शिवाजी विद्यापीठाचा ५८वा वर्धापन दिन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचा ५८वा वर्धापन दिन आज कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. विद्यापीठ प्रांगणात सकाळी ठीक ८:३० वाजता कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. यावेळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. कुलगुरू डॉ. शिर्के व मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि… Continue reading ‘असा’ साजरा झाला शिवाजी विद्यापीठाचा ५८वा वर्धापन दिन

…तर त्या विद्यार्थ्याला बुलेट बक्षीस ! : एकलव्य अॅकॅडमीची घोषणा

कळे (प्रतिनिधी) : धामणीखोऱ्यातील बळीपवाडी (ता. पन्हाळा) येथील एकलव्य अॅकॅडमीमार्फत होणाऱ्या सैन्यभरतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेळेनुसार विविध योजना राबवल्या जाणार आहेत. यामध्ये १६०० मीटरचे अंतर ४ मिनिटे ३० सेकंदात पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास ‘बुलेट’ दुचाकी मोफत देणार असल्याची घोषणा अॅकॅडमीचे प्रशिक्षक आबासाहेब बळीप यांनी केली आहे.  धामणीखोऱ्यात अतिशय कमी वेळात एकलव्य अॅकॅडमीचे सैन्यभरती व पोलीस भरतीमध्ये शंभरहून जास्त… Continue reading …तर त्या विद्यार्थ्याला बुलेट बक्षीस ! : एकलव्य अॅकॅडमीची घोषणा

‘प्रदूषण विरहित दिवाळी’वर वालावलकर हायस्कूलमध्ये वेबीनर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शां.कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये ‘प्रदूषण विरहित दिवाळी’ या विषयावर वेबिनार सादर करण्यात आले. व्याख्याते संजय सौंदलगे यांनी प्रदूषण कारणे आणि जबाबदारी सांगून यासाठी प्रत्येकाची जबाबदारी विषद केली. आनंदोत्सव साजरा करताना अनाथाश्रम, वृद्धाश्रम, बालकामगार यांचेही भान ठेवले पाहिजे, असे सांगतानाच प्रत्येकाच्या जीवनातील अंधार… Continue reading ‘प्रदूषण विरहित दिवाळी’वर वालावलकर हायस्कूलमध्ये वेबीनर

‘यासाठी’ जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : नोव्हेंबर, डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २० नोव्हेंबर पासून सुरु होत आहेत. परीक्षेत विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थी, पालकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मंडळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची २४ तास हेल्पलाईन नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती विभागीय सचिव सुरेश… Continue reading ‘यासाठी’ जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती

शाळांमध्ये रोज ‘इतके’ तास होणार… : शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव व जिल्ह्या-जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात आहे. अशा वेळी शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्यानंतर ४० मिनिटांचे चार तासच शाळेत होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.… Continue reading शाळांमध्ये रोज ‘इतके’ तास होणार… : शिक्षणमंत्र्यांची माहिती

आंतरजिल्हा बदलीसंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेऊ : हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सिंधुदूर्ग व इतर आंतरजिल्हा बदली संदर्भात दिवाळीनंतर मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (मंगळवार) येथे दिले. कागल येथील मंत्री मुश्रीफ यांच्या निवासस्थानी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हातर्गंत बदली, शालेय वीज बिल, मुख्यालय… Continue reading आंतरजिल्हा बदलीसंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेऊ : हसन मुश्रीफ

दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तू विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हापरिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तूंची जिल्हापरिषदेच्या आवारात आज (सोमवार) पासून ३ दिवस प्रदर्शन आणि विक्री चालू केली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या हस्ते आज करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी पणत्या, मेणपणत्या, आकाश कंदील, भेटवस्तू तयार केल्या आहेत. या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री आजपासून… Continue reading दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तू विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन (व्हिडिओ)

प्रा. सर्जेराव राऊत ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ने सन्मानित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चाटे शिक्षण संस्थेचे शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. सर्जेराव राऊत यांना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर या सामाजिक संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त पात्र शिक्षकांना त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर या संस्थेकडून नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येते. दरम्यान चाटे शिक्षण… Continue reading प्रा. सर्जेराव राऊत ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ने सन्मानित

दहावी, बारावीचे‌ वर्ग २३ नोव्हेंबरपासून : वर्षा गायकवाड

मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा प्रत्यक्ष उघडण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार दहावी आणि बारावीचे‌ वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर येणाऱ्या सोमवारी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची पायरी चढता येईल. गायकवाड म्हणाल्या की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य… Continue reading दहावी, बारावीचे‌ वर्ग २३ नोव्हेंबरपासून : वर्षा गायकवाड

error: Content is protected !!