शेतकऱ्यांचे आजपासून चक्काजाम आंदोलन; महामार्ग रोखून धरण्याचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा १७वा दिवस आहे. आतापर्यंत अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या मात्र शेतकरी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम असून आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीला जोडणारे महामार्ग अडवून ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल… Continue reading शेतकऱ्यांचे आजपासून चक्काजाम आंदोलन; महामार्ग रोखून धरण्याचा इशारा

‘कृषी कायद्यात बदल करण्यास तयार, आंदोलन मागे घ्या…’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्याविरोधात नवी दिल्लीत मागील दोन आठवड्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारशी शेतकरी नेत्यांच्या चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या होत्या. मात्र, तोडगा निघाला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेली चर्चा ही निष्फळ ठरली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन आणखीनच तीव्र केले. कृषी कायद्यात बदल करण्यास केंद्र सरकार तयार असून शेतकऱ्यांनी आंदोलन… Continue reading ‘कृषी कायद्यात बदल करण्यास तयार, आंदोलन मागे घ्या…’

रावसाहेब दानवेंना घरात घुसून मारावं लागेल : बच्चू कडू

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळेच ‘रावसाहेब दानवे यांना आता घरात घुसून मारावं लागेल’, असा संताप प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा वादग्रस्त दावा रावसाहेब दानवे… Continue reading रावसाहेब दानवेंना घरात घुसून मारावं लागेल : बच्चू कडू

टोप, धामोड, आळतेमध्ये ‘भारत बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले नवे कृषी कायदे रद्द व्हावेत, यासाठी मागील काही दिवसांपासून देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (मंगळवार) ‘भारत बंद’चे आवाहन करण्यात आले होते. त्याला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टोप, शिरोली, मौजे वडगांवसह परिसरात कडकडीत बंद.. टोप (प्रतिनिधी) : येथील शेतकऱ्यांनी तसेच राजकीय पक्षांनी… Continue reading टोप, धामोड, आळतेमध्ये ‘भारत बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद..

चंद्रकांतदादांनी एकदा कृषी कायदा वाचावा : राजू शेट्टी (व्हिडिओ)

केंद्र शासनाने केलेल्या कृषी कायद्या विरोधात भारत बंद आंदोलनाला सर्वपक्षीयांकडून पाठींबा देण्यात आला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी चंद्रकांतदादांनी एकदा कृषी कायदा वाचावा असा उपरोधिक सल्ला दिला.  

शिवसेना ‘या’ कायद्याच्या विरोधात शेवटपर्यंत लढत राहील : रविकिरण इंगवले (व्हिडिओ)

नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शिवसेना नेहमी शेतकऱ्याच्या पाठीशी राहील असे वक्तव्य शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केले.  

शेतीसाठी दिवसा दहा तासांचा वीजपुरवठा करावा : किसान सभेची मागणी 

सावरवाडी (प्रतिनिधी) : शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्याबरोबर शेतीला हंगामानुसार पाणी मिळावे. यासाठी राज्य शासनाने शेतीसाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा करावा. अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कौन्सील सदस्य नामदेव पाटील यांनी केली. पाटील म्हणाले की, सध्या ग्रामीण भागात नदी आणि विहीरीतून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी पाजण्यासाठी अनेक अडचणी शेतकऱ्यांना येतात. त्यासाठी… Continue reading शेतीसाठी दिवसा दहा तासांचा वीजपुरवठा करावा : किसान सभेची मागणी 

शेतकऱ्यांसाठी बंद पाळा : खा. संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला महाविकासआघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. आमचे तीन पक्ष एकत्र आहेत. तिन्ही पक्षांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केले आहे. हा बंद फार वेगळा आहे. शेतकऱ्यांसाठी बंद पाळावे, असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत… Continue reading शेतकऱ्यांसाठी बंद पाळा : खा. संजय राऊत

उद्याचा बंद कडकडीत पाळावा : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

नवीन कृषी कायद्या विरोधात उद्याचा (मंगळवार) होणारा बंद शांततेत आणि कडकडीत पाळावा असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.  

दादा काय पंतप्रधान लागून गेले काय ? : ना. मुश्रीफ (व्हिडिओ)

नवीन कृषी कायदा रद्द होऊच शकत नाही हे सांगायला दादा काय पंतप्रधान लागून गेलेत काय, असा उपरोधिक सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.  

error: Content is protected !!