मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळेच ‘रावसाहेब दानवे यांना आता घरात घुसून मारावं लागेल’, असा संताप प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा वादग्रस्त दावा रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्यानंतर दानवेंवर सगळीकडून टीका होत आहे. प्रहार संघटना औरंगाबादमध्ये शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून रावसाहेब दानवे यांच्याविरोधात आंदोलन करत आहे. तर दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर संताप व्यक्त केला. ‘मागच्या वेळीस रावसाहेब दानवे यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. पण आता असं वाटतंय की आम्हाला त्यांना घरात घुसून मारावं लागेल’, असे बच्चू कडू म्हणाले.